डायनॅमिक इंडिया फंड ३ मध्ये (डीआयएफ ३) केलेल्या गुंतवणुकीचे नुकसान झाल्याच्या आरोपाखाली एकूण पाचशेपकी ६९ अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांनी आयसीआयसीआय आणि संबंधित कंपन्यांना मॉरिशस सर्वोच्च न्यायालयात खेचले आहे. जागतिक दर्जाच्या प्रकल्पांमध्ये पसे गुंतविले जाणार असल्याचे आश्वासन दिले आणि प्रत्यक्षात मात्र ज्या स्थावर मालमत्ता प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यात आली ते कमालीचे अपयशी ठरल्याने गुंतवणुकीचे नुकसान झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. पण हे आरोप निराधार व हेतुपुरस्सर बदनामीकारक असल्याचा आयसीआयसीआय व्हेंचर्सने केला आहे.
डीआयएफ ३ ही पब्लिक लिमिटेड कंपनी असून, मॉरिशसमध्ये १४ एप्रिल २००५ रोजी ही कंपनी मर्यादित उद्दिष्टाकरिता सुरू झाली असून त्यांच्याकडे मॉरिशसच्या वित्तीय सेवा आयुक्तालय या सरकारच्या नियामक मंडळाने दिलेला जागतिक व्यवसायाचा विभाग एकमधील परवाना आहे. इंटरनॅशनल फायनान्शिअल सíव्हसेस (आयएफएस)तर्फे डीआयएफ ३चे व्यवस्थापन केले जात असून या कंपनीची स्थापनाही मॉरिशसमध्ये करण्यात आली होती.
आयसीआयसीआय बँक व आयसीआयसीआय व्हेंचर यांनी डीआयएफ ३ची स्थापना व प्रचार केला आहे. भारताच्या स्थावर मालमत्ता बाजारपेठेत परदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता यावी म्हणून त्याची स्थापना करण्यात आली होती.
अनिवासी भारतीयांच्या एका समूहाने आणि परदेशी गुंतवणूकदारांनी मॉरिशसच्या सर्वोच्च न्यायालयात डीआयएफ ३, इंटरनॅशनल फायनान्शियल सíव्हसेस (आयएफएस), आयसीआयसीआय व्हेंचर्स फंड मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक आणि वेस्टर्न इंडिया ट्रस्टी अँड एक्झिक्युटर कं. लि. यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे, असे या प्रकरणी कायदेशीर बाजू सांभाळणाऱ्या बनीमंधुप बुलेल चेंबर्स यांनी सांगितले. या कंपन्यांनी एकत्रितपणे १०३,६९९,९७६ डॉलरची भरपाई व्याजासहित द्यावी असा दावा गुंतवणूकदारांनी केला आहे.
अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांचा ‘आयसीआयसीआय’कडे भरपाईचा दावा
डायनॅमिक इंडिया फंड ३ मध्ये (डीआयएफ ३) केलेल्या गुंतवणुकीचे नुकसान झाल्याच्या आरोपाखाली एकूण पाचशेपकी ६९ अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांनी आयसीआयसीआय आणि संबंधित कंपन्यांना मॉरिशस सर्वोच्च न्यायालयात खेचले आहे.
First published on: 29-10-2014 at 12:01 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nri investors file compensation claims on icici