व्यवहाराच्या सुरुवातीलाच विक्रमी तळाला पोहोचलेला रुपया पाहून भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी मंगळवारी उरली सुरली उमेदही सोडून दिली. परिणामी सेन्सेक्स एकाच व्यवहारात ४५० अंशांनी घसरताना १९ हजाराच्याही खाली आला. निफ्टीतही जवळपास दिडशे अंशांची घट होऊन राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ५,५०० वर येऊन ठेपला आहे. प्रमुख निर्देशांकाची ही २७ जूननंतरची सर्वात खालची पातळी आहे.
भांडवली बाजाराने सलग आठ सत्रात हजार अंशांची घट नोंदविल्यानंतर सोमवारी नव्या सप्ताहाचा प्रारंभ किरकोळ वाढीने केला होता. मंगळवारी मात्र कमकुवत आशियाई बाजारांमुळे सेन्सेक्समध्ये सुरुवातीलाच शतकी घसरण झाली. याचवेळी सकाळच्या व्यवहारात रुपयाने ६१ च्या खाली सरकताना ६१.५१ ला नवा नीचांक गाठल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी येथेही समभाग विक्रीचा सपाटा सुरू केला. याचवेळी सेन्सेक्समध्ये २०० अंशापर्यंतची घसरण होऊन मुंबई निर्देशांकानेही १९ हजाराचा स्तर सोडला. दुपारपूर्वीच निर्माण झालेल्या या वातावरणात आघाडीचे क्षेत्रीय निर्देशांकही लोळण घेऊ लागले. निर्देशांकातील ही घसरण उत्तरोत्तर वाढतच गेली. दिवसअखेर बाजार ४४९.२२ अंशांने आपटी घेत १९ हजाराच्याच खाली, १८,७३३.०४ पर्यंत गडगडला. एकाच व्यवहारातील त्याची मोठी घसरणही महिन्याभराच्या कालावधीतील ठरली. यापूर्वी ५२६ अशी घट त्याने जूनच्याच २० तारखेला नोंदविली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानाच्या पंक्तीतून बाहेर
प्रत्येक १० समभागांमागे ७ समभाग घसरणीच्या यादीत आणि गुंतवणूकदारांची मालमत्ताही १.३७ लाख कोटींनी रोडावली. गुंतवणूकदारांसह सव्वाशे वर्ष जुन्या मुंबई शेअर बाजारालाही ‘ट्रिलियन डॉलर क्लब’मधून (एक लाख कोटी डॉलर) बाहेर पडावे लागले. भारतातील आघाडीच्या या बाजाराचे बाजार मूल्य ९८९ अब्ज डॉलर (६०,१८,५०३.८८ लाख कोटी रुपये) झाले आहे. एक लाख कोटी डॉलरमध्ये सध्या जगभरातील १३ भांडवली बाजार समाविष्ट आहेत. या श्रेणीत मुंबई शेअर बाजाराचा सर्वप्रथम २००७ मध्ये समावेश झाला होता. त्यानंतर आर्थिक मंदीमुळे सप्टेंबर २००८ मध्ये पुन्हा त्यातून बाहेर पडणे झाले. मे २००९ पासून मात्र तो या पंक्तीत होता.