आरोग्यपूर्ण आहाराबाबत दक्षता घेणाऱ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला खाद्यतेल ‘न्यूट्रेला’ला अलीकडेच त्याच्या लोकप्रियतेबरोबतच गुणात्मकतेची मोहोर उमटविणाऱ्या ‘मास्टर ब्रॅण्ड’ या किताबाने गौरविण्यात आले आहे. अलीकडेच मुंबईच्या ताज लॅण्ड्स एंड हॉटेलमध्ये झालेल्या समारंभात चीफ मार्केटिंग ऑफिसर कौन्सिल आणि सीएमओ एशियाद्वारे ‘न्यूट्रेला’ला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘न्यूट्रेला’ ब्रॅण्ड बाजारात आणणाऱ्या रूची सोया इंडस्ट्रीज लि.चे विपणन विभागाचे साहाय्यक उपाध्यक्ष संदीपन घोष यांनी मास्टर ब्रॅण्ड चषक व प्रमाणपत्र फोर्ब्स समूहाचे अध्यक्ष व मुख्याधिकारी डेव्हिड फोर्ब्स यांच्या हस्ते स्वीकारले.    

Story img Loader