चीन, अमेरिका आणि अन्य अनेक बडय़ा अर्थव्यवस्थांमध्ये अर्थगती मंदावण्याची, त्या उलट भारतात स्थिरपणे अर्थवृद्धीचा संभव व्यक्त करणारे भाकीत पॅरिसस्थित आर्थिक सहयोग आणि विकास संघटना (ओईसीडी)ने व्यक्त  केले आहे.
विविध सम्मिलीत निर्देशकांच्या (सीएलआय) हवाल्याने करण्यात आलेल्या या भाकीतात, युरो क्षेत्रात फ्रान्स  इटलीत सुधारात संकेत, तर जर्मनी, जपान आणि भारतात अर्थचक्र स्थिरपणे वेग पकडत असल्याचे संकेत मिळत असल्याचे ओईसीडीने स्पष्ट केले आहे.
ओईसीडीने मे महिन्यात केलेल्या ३४ देशांविषयीच्या आकलनात, भारताचा वृद्धीपथ हा गुंतवणूकविषयक चित्रात सुधार झाल्यामुळे ‘स्थिर व सशक्त’ अशा ७.३ टक्के विकास पावताना दिसत असल्याचे नमूद केले गेले आहे. भारताने सरलेल्या आर्थिक वर्षांच्या अंतिम मार्च तिमाहीत ७.५ टक्क्यांचा आर्थिक विकास दर नोंदवून, जगातील सर्वाधिक वेगाने विकास पावत असलेली अर्थव्यवस्था म्हणून चीनला मागे टाकले आहे.
ओईसीडीच्या कयासांनुसार, अमेरिका, चीन, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये अर्थवृद्धीला बांध लागला असून, ती काहीशी संथावण्याचे संकेत आहेत. तसेच रशियाबाबतचे ताजे संकेत हे तेथे अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदलाकडे अग्रेसर ठोस नसली तरी पुसटशी लक्षणे दिसत आहेत, तर ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेकडून वृद्धीपथ गमावला जाण्याचे संकेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oecd indicates employment is growing too slowly