संकेतस्थळाच्या व्यासपीठावर होणाऱ्या आदरातिथ्य सेवा नोंदणीचा व्यवसाय येत्या वर्षभरात दुप्पट होणार असल्याचा आशावाद ‘हॉटेलडॉटकॉम’च्या भारतीय विभागाचे (विपणन) प्रमुख राजीव मलहोत्रा यांनी व्यक्त केला. ई-कॉमर्स, ऑनलाईन पेमेन्ट यासारख्या सुविधांमुळे संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी होण्याचा कल येत्या दोन ते तीन वर्षांत अधिक वाढीस लागेल, असे त्यांनी कोणत्याही आकडेवारीविना सांगितले.
भक्कम रुपयामुळे श्रीलंका आणि अधिक विमानप्रवास सुविधेमुळे मलेशियासारख्या आशियातील देशांमध्ये संकेतस्थळाच्या व्यासपीठावर अधिकाधिक हॉटेल वास्तव्य नोंदणी होत असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यातुलनेत युरोपात याबाबत सध्या नकारात्मक वातावरण आहे, हेही त्यांनी नमूद केले.
‘हॉटेलडॉटकॉम’च्या ‘वेलकम रिवार्ड’ या १० दिवसांच्या वास्तव्यावर एक रात्र मोफत या योजनेला गेल्या वर्षभरात ५० लाख ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याचे यानिमित्ताने मलहोत्रा यांनी सांगितले. आशियातील ८५ देशांमध्ये कार्यरत कंपनीने १.६० लाख हॉटेलच्या माध्यमातून आणि ७० लाख ग्राहक जोडले आहेत.
कंपनीची ही सुविधा आयफोन, अॅण्ड्रॉइड, आयपॅडनंतर आता ब्लॅकबेरी, विण्डोज८ या तंत्रज्ञानावरही उपलब्ध होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा