सेबीने वेळोवेळी गुंतवणूकदारांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. जसे की एकदा डिमॅट खाते किंवा ट्रेिडग खाते उघडले की परत परत ‘केवायसी’ कागदपत्रे देण्याची गरज नाही कारण त्याची नोंद एकत्रितरीत्या सीडीएसएल व्हेंचर्स लिमिटेड ही संस्था करीत असते. इतरही काही अशा संस्था आहेत. नुकतेच म्हणजे ४ डिसेंबर २०१३ रोजी सेबीने काढलेल्या आदेशानुसार यापुढे डिमॅट खाते उघडताना पूर्वीप्रमाणे डीपी आणि गुंतवणूकदार यांच्यात करारनामा (अ‍ॅग्रीमेंट) करायची गरज नाही. त्यामुळे अशा करारनाम्यावर (अ‍ॅग्रीमेंटवर ) भरावे लागणारे १०० रुपये मुद्रांक शुल्क आता आपोआपच बाद झाले आहे. १०० रुपये हे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प डय़ुटी) महाराष्ट्रापुरते मी सांगत आहे. इतर राज्यांत हे दर वेगवेगळे असतात. लहान गुंतवणूकदारांना तर हा मोठाच दिलासा आहे.
सदर करारनामा रहित करून त्याची जागा घेतली आहे ती हक्क आणि दायित्व  (Rights and Obligations) या दस्तऐवजाने. या दस्तऐवजामध्ये विशेष असे काही नाही फक्त डीपी आणि डिमॅट खातेधारक यांनी काय पथ्ये पाळायची, उदाहरणार्थ वार्षकि चार्ज भरला नाही तर डीपी काय कारवाई करू शकतो वगरे बाबी त्यात नमूद केल्या आहेत. सांप्रत डिमॅट खाते उघडण्यासाठी वार्षकि चार्जवगळता यापुढे काहीच द्यावे लागणार नाही. याचे कारण अकाऊंट ओपिनग चार्ज आता सहसा कुणीच डीपी घेत नाही. कारण सेबीचा तसा नियमच आहे. खाते बंद करतानाही चार्ज भरावा लागत नाही हेही ओघानेच सांगतो. मुद्रांक शुल्क बाद करायची बातमी सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने दिली आहे याचा खास उल्लेख करावासा वाटतो. काही वाचकांनी फोन करून विचारणा केली आहे की, यापूर्वी ज्यांनी डिमॅट खाती उघडली आहेत त्यांना मुद्रांक शुल्काचा परतावा मिळणार काय? याचे स्पष्ट उत्तर ‘मिळणार नाही’ असे आहे! टूथपेस्टच्या टय़ूबमधून पेस्ट बाहेर काढता येते तथापि परत आत भरता येत नाही तसेच हे आहे. एकदा आपल्या खिशातून बाहेर गेलेली ही मुद्रांक शुल्काची रक्कम परत खिशात येणार नाही. ‘गतं न शोच्यं’ असे संस्कृत सुभाषित आहे!
वर उल्लेख केलेल्या हक्क आणि दायित्व या दस्तऐवजावरील मजकूर तुलनेत खूप कमी आहे, त्यामुळे पानांची संख्या कमी झाली आहे, पर्यायाने कराव्या लागणाऱ्या सह्य़ांची संख्याही कमी होईल.
याच परिपत्रकात इतरही काही बाबी स्पष्ट केल्या आहेत, जसे की डिमॅट खातेदाराने डीपीचे शुल्क वेळोवेळी अदा केले नाही तर दोन दिवसांची सूचना देऊन डीपी डिलिव्हरी इंस्ट्रक्शन स्लिप नाकारू शकतो. तसेच खातेदाराची काही तक्रार असेल तर डीपीने त्याचे  निवारण ३० दिवसांच्या आत करावयाचे आहे.
मागील लेखात वाचक तसेच श्रोते यांच्याविषयी लिहिले होते. ‘श.. शेअर बाजाराचा’ ही लेखमाला सुरू झाल्यापासून त्यातील प्रत्येक लेख अभ्यासूपणे वाचून तसेच त्याची कात्रणे नीट फाइल करून ठेवणारे आणि त्यातील माहिती वेळोवेळी इतरांना सांगणारे ८२ वर्षीय वाचक प्रभाकर मंजुरे. त्यांच्या घरी जाऊन ती फाइल पाहावी अशी माझी इच्छा होती. पण दुर्दैवाने नुकतेच त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या सुपुत्राने दिली. तसेच त्या फाइलचे छायचित्रदेखील त्यांनी पाठवले.
बार्शीहून यशवंत माने यांचे म्हणणे असे आहे की, त्यांनी एका ब्रोकरला शेअर्स विकत घेण्यासाठी पसे दिले आणि दोन महिने झाले तरी शेअर्स मिळाले नाहीत. डिमॅट खाते कुठे उघडले आहे ते माने यांना माहीत नाही. ब्रोकर म्हणतो की शेअर्स सेबीकडे ठेवले आहेत, त्यामुळे ते सुरक्षित आहेत! यशवंतजी, सर्वप्रथम एक बाब लक्षात घ्या की, सेबी ही नियंत्रक संस्था आहे. सेबी म्हणजे बँकेतील लॉकर नव्हे जिथे कुणी दागिने किंवा शेअर्स ठेवावेत! त्यामुळे तुमचा ब्रोकर जे काही सांगत आहे त्यावरून असे वाटते की, तो अधिकृत तसेच सेबीकडे नोंदणीकृत नसावा. याची खातरजमा करून घेण्यासाठी सेबीच्या वेबसाइटवर जाऊन आपण पाहू शकता. आपण इंटरनेट वापरण्यास असमर्थ असाल तर त्या ब्रोकरच्या कार्यालयात सेबीद्वारा वितरित झालेले सर्टििफकेट लावले आहे की नाही ते पाहा. तुमचा ब्रोकर हा सब-ब्रोकर असेल तर त्या सर्टििफकेटवर त्याच्या मुख्य ब्रोकरचे नाव तसेच त्या सब-ब्रोकरचे नाव लिहिलेले असेल. तुमचे डिमॅट खाते त्या ब्रोकरनेच उघडून दिले असेल तरीही संबंधित डीपीकडून तुम्हाला स्वागतपत्र आलेच असणार, ज्यात तुमचा डिमॅट खाते क्रमांक लिहिलेला असतो. तो क्रमांक कठ3 ने सुरू झाला असेल, तर तुमचे खाते एनएसडीएलकडे आहे आणि १२०, १३०, १६० अशा क्रमांकाने सुरू होत असेल तर सीडीएसएलकडे आहे असे समजावे. जर तुमचा ब्रोकर नोंदणीकृत नसेल, तर त्याच्याशी केलेल्या व्यवहारांना कसलेही संरक्षण नाही हे लक्षात ठेवा. डिमॅट खाते उघडायचा अर्ज भरतेवेळी तो कोणत्या डीपीचा आहे हे पाहणे आवश्यक होते, जे तुम्ही केले नाही. त्यामुळे कोणत्या डीपीकडे खाते उघडले आहे हे तो ब्रोकरच सांगू शकेल. ज्या कागदांवर आपण सह्य़ा करतो ते न वाचण्याची सवय अनेकांना असते. ती कटाक्षाने टाळावी म्हणजे असले अप्रिय प्रकार घडत नाहीत. फेब्रुवारीमध्ये बार्शी येथे रोटरी क्लबमध्ये व्याखान आहे तिथे मला जरूर भेटा, म्हणजे सर्व शंकांचे निरसन होऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा