भारतात खुली समाजव्यवस्था असणे गरजेचे असून या व्यवस्थेला कोणी बाधा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा प्रतिकार केला पाहिजे, अन्यथा खुल्या समाजव्यवस्थेसारख्या सर्वात मोठय़ा लाभाला भारताला मुकावे लागेल, असे मत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले.
आपल्याला जे ऐकण्यास आवडेल ते तुम्ही बोलला नाहीत तर तुमची खैर नाही, असे अतिडाव्या आणि अतिउजव्या विचारसरणीने न बोलणे महत्त्वाचे आहे, असेही राजन यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. सकारात्मक चर्चा झाली पाहिजे, तुम्ही तसे वातावरण टिकविले पाहिजे आणि मुख्य प्रवाहाचा त्याला पाठिंबा आहे ही चांगली बाब आहे, असेही राजन म्हणाले.
दिल्ली आयआयटीमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी केलेल्या भाषणाचा संदर्भ देऊन राजन म्हणाले की, चर्चा कोणत्या दिशेला जात आहे आणि त्यामधून आपल्याला अधिक लाभ कसा घेता येईल, त्याबाबत ते भाषण होते आणि त्यासाठी खुली समाजव्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यामुळे अशी व्यवस्था बाधित करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला प्रतिकार केला पाहिजे. भारतातील लोकशाही अधिक बळकट आहे. सहिष्णुता आणि परस्पर आदरभाव याद्वारे नव्या कल्पनांना पोषक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, अतिराजकीय हस्तक्षेपामुळे प्रगतीमध्ये बाधा येते.

grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
PM Modi to youth: Step out of comfort zone to build Viksit Bharat by 2047
युवक देशाला २०४७पर्यंत विकसित करतील ; ‘विकसित भारत युवा नेता संवाद’ मध्ये पंतप्रधान मोदींचा विश्वास
security beefed up around z morh tunnel
‘झेड मोढ’ बोगद्याभोवती सुरक्षा व्यवस्थेत वाढ; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटनाची शक्यता
ruhcir sharma
२०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कशी असेल?
Muralidhar Mohol
सहकारातील त्रिस्तरीय पतरचनेची साखळी मजबूत करण्याची गरज- मुरलीधर मोहोळ
Story img Loader