सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नैरोबी, केनिया येथील प्रतिनिधी कार्यालयाची नुकतीच स्थापना करण्यात आली. भारताचे उच्चायुक्त शिवब्रत त्रिपाठी यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष मोहन टांकसाळे, कार्यपालक निर्देशक मलय मुखर्जी, एस.एस. राव, दारा सिंह नायक, के.ईश्वर, अनिवासी भारतीय व नैरोबीमधील स्थानिक नागरिक उपस्थित होते.
हे कार्यालय स्थानिक स्तरावर आफ्रिकन मार्केटमध्ये आपली दीर्घकालीन ओळख बनविण्यासाठी आणि व्यावसायिक संधींच्या शोधासाठी उपयोगात आणणार असल्याची माहिती बँकेतर्फे देण्यात आली.

Story img Loader