तयार दागिने निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सने नजीकच्या कालावधीत नव्याने सुरू करण्यात आलेल्या हिरे दागिने निर्मितीत चौपटीने वेग राखण्याची मनीषा व्यक्त केली आहे. गेल्या १८२ वर्षांची नाममुद्रा असलेल्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सच्या अंधेरी (पूर्व) येथील ४,००० चौरस फूट क्षेत्रफळातील नव्या हिरे निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच झाले. या वेळी पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ उपस्थित होते.
नव्या प्रकल्पामुळे कंपनीला हिरेजडित दागिन्यांची नवी शंृखला सादर करणे सुलभ होईल. येथे तयार करण्यात आलेले हिरेजडित दागिने कंपनीच्या कुशल कामगारांनी तयार केले आहेत. दागिन्यांमध्ये बसविण्यात आलेले हिरे हे प्रमाणित असून त्यांचा दर्जा राखण्यावर भर देण्यात आल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.

Story img Loader