सोन्यामधील गुंतवणूक कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेच्या समितीने बुधवारी काही शिफारसी केल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या रकमेच्या सोने खरेदीसाठी पॅनकार्ड आवश्यक करणे, चेकने रक्कम देण्याची अट घालणे, सोने खरेदीसाठी कर्ज देण्यावर बंदी घालणे आदींचा समावेश आहे. 
सोन्याच्या आयातीचा अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम लक्षात घेता सामान्यांना सोन्यातील गुंतवणूकीपासून परावृत्त करण्यासाठी या समितीने आपल्या शिफारसी केल्या आहेत.
सोन्यातील गुंतवणूक कमी करण्यासाठी इतर गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत. मोठ्या रकमेचे सोने खरेदीचे व्यवहार चेकनेच करणे बंधनकारक करावे, सोनेखरेदीसाठी पॅनकार्ड आवश्यक करावे. सोनेखरेदीसाठी बॅंकांनी अजिबात कर्ज देऊ नये अशा शिफारसी करण्यात आल्या आहेत. बॅंकांकडून होणाऱया सोन्याच्या आयातीवर बंधन घालण्याची सूचनाही करण्यात आली आहे. सध्या देशात सोन्याच्या एकूण आयातीपैकी सुमारे ६० टक्के आयात बॅंकांकडून केली जाते. सोन्यातील गुंतवणुकीसाठी बॅंकांकडून दिल्या जाणाऱया पाच लाखांपेक्षा जास्त रुपयांच्या कर्जावर पॅनकार्ड बंधनकारक करावे, अशी सुचना समितीने केली. सध्या सराफी बाजारातून पाच लाखांपेक्षा जास्त रकमेची सोने खरेदी केल्यास ग्राहकाकडून पॅनकार्ड घेतले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा