योगगुरू रामदेव बाबा पतंजली आयुर्वेद या एफएमसीजी प्रकल्पाने देशात सहा ठिकाणी नूडल्स व इतर उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले आहे. पाच महिन्यांच्या बंदीनंतर मॅगी नूडल्स बाजारात आल्या व त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे नेस्ले इंडिया कंपनीने म्हटले होते. पतंजली आयुर्वेद कंपनीच्या नूडल्स आजपासून बाजारात उपलब्ध करण्यात आल्या.
पतंजली आयुर्वेद कंपनीने दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेशात एका वर्षांत उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले आहे. तेथे इतर वस्तूंचेही उत्पादन होईल. डिसेंबर अखेरीस आमच्या नूडल्स बाजारात येतील व १० लाख दुकानातून त्यांची विक्री होईल, असे रामदेव बाबा यांनी सांगितले पण नवीन प्रकल्पांमध्ये किती गुंतवणूक केली जाणार आहे हे सांगितले नाही.
पंतजली आयुर्वेदच्या ७० ग्रॅम नूडल्स पंधरा रुपयांना मिळणार असून इतर स्पर्धक कंपन्यांपेक्षा हा दर कमी असणार आहे. इतर कंपन्यांच्या नूडल्स २५ रुपयांना मिळतात. पतंजली आयुर्वेद नूडल्स या रिलायन्स फ्रेश, बिग बझार, डी मार्ट व पतंजली वितरण व्यवस्था यांच्या मार्फत विकल्या जाणार आहेत. नेस्ले इंडियाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार नवीन चाचण्या केल्या व त्यात शिसे व मोनोसोडियम ग्लुटोमेटचे प्रमाण मर्यादेत आढळल्याने त्या बाजारात विक्रीस आणल्या आहेत. बालसंगोपन, त्वचा विकार व इतर आरोग्य पूरक उत्पादनांमध्ये पतंजली आयुर्वेद प्रवेश करणार आहे, असे रामदेवबाबा यांनी सांगितले. योगासाठी आवश्यक असलेले कपडे व इतर कपडय़ांच्या बाजारपेठेतही  प्रवेश करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. डिसेंबर अखेरीस शिशु केअर, सौंदर्य, पॉवर व्हिटा व वस्त्रम ही उत्पादने बाजारात आणली जाणार आहेत. २०१४-१५ अखेर कंपनीची उलाढाल २००७ कोटींची असून ती या वर्षी पाच हजार कोटींपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.
शेअर बाजारात नोंदणीबाबत विचारले असता इतक्यात तसा विचार नसल्याचे रामदेवबाबा यांनी सांगितले. निर्यातीबाबत ते म्हणाले, की सध्या आम्ही देशातील लोकांच्या गरजा पूर्ण करणार आहोत. बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी आम्ही आटा नूडल्स व केश संवर्धक औषधे, टूथपेस्ट व तूप यांच्या जाहिराती दूरचित्रवाणीवर सुरू करीत आहोत.
पिपावाव डिफेन्समधील हिस्सा खरेदीची प्रक्रियाही सुरू होणार
अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी पिपावाव डिफेन्स अ‍ॅन्ड ऑफशोअर इंजिनीअरिंगमधील खुली भाग प्रक्रिया २ डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. १,२६३ कोटी रुपयांद्वारे कंपनी २६ टक्के हिस्सा पादाक्रांत करेल. त्यासाठी प्रति समभाग ६६ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. या व्यवहारासाठी संबंधित आवश्यक परवानगी मिळत असल्याचे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने सोमवारीच स्पष्ट केले. १५ डिसेंबपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ” ४१७.०५    (+५.८४%)
रिलायन्स पॉवर    ” ४९.६०    (+२.२७%)

Story img Loader