रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम कच्चा तेलाच्या किमतींवर होत आहेत. या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर वाढले आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरेल ९५ ते १२५ अमेरिकन डॉलर्स होण्याची शक्यता आहे. यामुळे इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल १५ ते २२ रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज उत्तर प्रदेशात मतदानाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर ही वाढ होईल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तथापि, उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होणारा परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो, परंतु पूर्णपणे नाही. सद्यस्थितीत, भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्के आयात करतो. इंधन दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रशिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा उत्पादक देश आहे. रशियावरील निर्बंधांमुळे जागतिक पुरवठा कमी होईल अशी भीती आहे.
या आधीच कच्च्या तेलाच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे महागाईत सुमारे १० बेस पॉइंट्सची भर पडली आहे. तुटवडा आणि कमी पुरवठा होण्याच्या भीतीने ब्रेंट क्रूड तेलाच्या किंमती १० वर्षांच्या उच्च पातळीवर पोहोचल्या असून प्रति बॅरल १२० अमेरिकन डॉलर्स झाल्या आहेत. “रशियावरील निर्बंधांमुळे पुरवठा कमी होण्याच्या भीतीमुळे इराणकडून येणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमती पुढील आठवड्यात १३० अमेरिकन डॉलर्सवर पोहोचतील आणि ९५ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलला समर्थन देतील,” असं एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी बिझनेस स्टँडर्सला सांगितलं.
Russia Ukraine War Live: पंतप्रधान मोदी आज पुतिन यांच्याशी फोनवर बोलणार
महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | ११०.४८ | ९३.२४ |
अकोला | ११०.३३ | ९३.१२ |
अमरावती | १११.१४ | ९३.९० |
औरंगाबाद | १११.०५ | ९३.७९ |
भंडारा | ११०.८८ | ९३.६५ |
बीड | १११.५९ | ९४.३२ |
बुलढाणा | ११०.१६ | ९२.९६ |
चंद्रपूर | ११०.६५ | ९३.४५ |
धुळे | १०९.६९ | ९२.४९ |
गडचिरोली | ११०.६५ | ९४.०० |
गोंदिया | १११.१८ | ९३.९४ |
बृहन्मुंबई | ११०.१६ | ९४.३२ |
हिंगोली | १११.०७ | ९३.८४ |
जळगाव | ११०.८६ | ९३.६३ |
जालना | १११.५८ | ९४.३० |
कोल्हापूर | १०९.६६ | ९२.४८ |
लातूर | १११.०४ | ९३.७९ |
मुंबई शहर | १०९.९८ | ९४.१४ |
नागपूर | १०९.७५ | ९२.५६ |
नांदेड | ११२.२७ | ९४.९९ |
नंदुरबार | ११०.६७ | ९३.४३ |
नाशिक | ११०.६४ | ९३.३९ |
उस्मानाबाद | ११०.०८ | ९२.८७ |
पालघर | १०९.७५ | ९२.५१ |
परभणी | ११२.८८ | ९५.५५ |
पुणे | १०९.५८ | ९२.३७ |
रायगड | ११०.१५ | ९२.८९ |
रत्नागिरी | १११.६८ | ९२.८९ |
सांगली | ११०.०९ | ९२.८९ |
सातारा | ११०.६३ | ९३.३८ |
सिंधुदुर्ग | १११.४९ | ९४.२४ |
सोलापूर | ११०.१६ | ९२.९५ |
ठाणे | ११०.१२ | ९४.२८ |
वर्धा | १०९.९१ | ९२.७२ |
वाशिम | ११०.५४ | ९३.३२ |
यवतमाळ | १११.०२ | ९३.७९ |