रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम कच्चा तेलाच्या किमतींवर होत आहेत. या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर वाढले आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरेल ९५ ते १२५ अमेरिकन डॉलर्स होण्याची शक्यता आहे. यामुळे इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल १५ ते २२ रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज उत्तर प्रदेशात मतदानाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर ही वाढ होईल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तथापि, उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होणारा परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो, परंतु पूर्णपणे नाही. सद्यस्थितीत, भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्के आयात करतो. इंधन दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रशिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा उत्पादक देश आहे. रशियावरील निर्बंधांमुळे जागतिक पुरवठा कमी होईल अशी भीती आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा