देशाच्या कोळसा व ऊर्जा- अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात एक लाख कोटी डॉलरच्या गुंतवणुकीची संधी असल्याचे या खात्याचा कार्यभार पाहणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहादरम्यान सोमवारी प्रदर्शनस्थळी उपस्थिती दर्शवीत गोयल यांनी ही गुंतवणूक वर्ष २०३० पर्यंत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
आगामी पाच वर्षांत २५० अब्ज डॉलरची गुंतवणूक कोळसा व ऊर्जा- अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात या तीन क्षेत्रात होणे अपेक्षित असल्याचे गोयल यांनी सांगितले. भारतात ऊर्जा क्षेत्रात उपलब्ध संधीचा लाभ जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार नक्कीच घेतील, असे नमूद करत त्यांनी उपस्थित उद्योजकांना सरकारच्या उपक्रमात सहभाही होण्याचे आवाहन केले.
देशातील ऊर्जा कंपन्यांना अर्थसाहाय्य देऊ करणाऱ्या उदय योजनेचा लाभ घेण्याची तयारी विविध १५ राज्यांनी दाखविली असून आणखी काही राज्ये यात लवकरच सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘उदय योजना’ ही राज्यांच्या ढासळत्या वीज कंपन्यांना केवळ सावरणे अथवा सरकारी अनुदान या पद्धतीची नसल्याचे स्पष्ट करत गोयल यांनी ही योजना म्हणजे ऊर्जा क्षेत्राने भविष्याकडे वाटचाल करण्याचा मदतकारक मार्ग ठरणार असल्याचे सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा