नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत लोकशाही आघाडीचे स्थिर सरकार आता केव्हाही विराजमान होण्याच्या स्थितीत असताना त्याच्या आशेवरचा भांडवली बाजाराच्या तेजीचा प्रवास अद्यापही संपलेला नाही. नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना प्रमुख निर्देशांक सोमवारी पुन्हा नव्या उच्चांकाला पोहोचला. यामध्ये २४१.३१ अंश वाढीसह सेन्सेक्स २४,३६३.०५ पर्यंत तर निफ्टी ६०.५५ अंशवधारणेमुळे ७,२६३.५५ वर पोहोचला.
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी राहताना सोमवारअखेर निर्देशांकांची वाढ ही २ टक्क्यांहून अधिक राहिली आहे. सेन्सेक्सचा व्यवहारातील सर्वोच्च टप्पा शुक्रवारी २५ हजार तर निफ्टीचा ७,५०० पर्यंतचा नोंदला गेला. या दिवशी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची खरेदीही ३,६३४.८२ कोटी रुपयांची झाली. सोमवारी भांडवली वस्तू, ऊर्जा निर्देशांकांनी कमाई केली.
सेन्सेक्समध्ये सार्वजनिक क्षेत्रातील भेलचा समभाग तब्बल १७ टक्क्यांनी वधारला. कोल इंडिया, एनटीपीसीलाही दुहेरी आकडय़ातील वाढ फळफळली. टाटा पॉवर, हिंदाल्को, एल अ‍ॅण्ड टी, स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक यांचेही समभाग मूल्य वाढले. माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्मिती कंपन्यांच्या समभाग मूल्यांवर दबाव राहिला.
केंद्रात येणाऱ्या स्थिर सरकारमुळे देशाचे पतमानांकन उंचावण्याच्या आशेनेही बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्समधील १९ समभागांचे मूल्य उंचावले. स्मॉल कॅप व मिड कॅपही अनुक्रमे ४.१९ व ५.८२ टक्क्यांनी वधारले. भक्कम होणारे चलनही निर्देशांकाला गती देऊन गेले.

रुपयाचाही सशक्त प्रवास
परकी चलन व्यवहारात भारतीय रुपयातील सशक्तता सप्ताहारंभीदेखील राहिली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी २० पैशांनी भक्कम होत ५८.५९ वर पोहोचला. ५८.५३ तेजीसह सुरू झालेला आठवडय़ातील पहिल्या दिवसाचा चलनाचा प्रवास सुरुवातीच्या काही मिनिटातच ५८.३७ पर्यंत गेला. दिवसअखेर ५८.६१ असा तळ गाठल्यानंतर त्यात शुक्रवारच्या तुलनेत वाढ नोंदली गेली. बरोबर आठवडय़ापासून चलनात भर नोंदली जात आहे. यापूर्वीच्या तीनच व्यवहारात त्यात ११६ अंशांची वाढ झाली आहे. यामुळे गेल्या सोमवारी ६०.०५ वर असणारा रुपया आता आता ११ महिन्याच्या उच्चांकावर येऊन ठेपला आहे.

मोदी सरकार अन् बाजाराला भरते!
नरेंद्र मोदीप्रणीत भाजप सरकारच्या बाजूने ऐतिहासिक कौलाला, सेन्सेक्सला २५,००० तर निफ्टीला ७,५०० पल्याड नेऊन दणदणीत सलामी देणाऱ्या भांडवली बाजाराचा उत्साही कल पुरेसा बोलका आहे. गेल्या केवळ तीन महिन्यात केंद्रात सत्ताबद्दल होऊन मोदी सरकार येईल या आशेने सेन्सेक्सने तब्बल १८ टक्क्य़ांची झेप घेतली आहे. आता बाजाराला अपेक्षित निकाल आलेला पाहता, अग्रेसर दलाल पेढय़ांनी डिसेंबर २०१४ पर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टीकडून नवे शिखर सर करण्याचे कयास व्यक्त केले आहेत. ते असे..

Story img Loader