नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत लोकशाही आघाडीचे स्थिर सरकार आता केव्हाही विराजमान होण्याच्या स्थितीत असताना त्याच्या आशेवरचा भांडवली बाजाराच्या तेजीचा प्रवास अद्यापही संपलेला नाही. नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना प्रमुख निर्देशांक सोमवारी पुन्हा नव्या उच्चांकाला पोहोचला. यामध्ये २४१.३१ अंश वाढीसह सेन्सेक्स २४,३६३.०५ पर्यंत तर निफ्टी ६०.५५ अंशवधारणेमुळे ७,२६३.५५ वर पोहोचला.
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी राहताना सोमवारअखेर निर्देशांकांची वाढ ही २ टक्क्यांहून अधिक राहिली आहे. सेन्सेक्सचा व्यवहारातील सर्वोच्च टप्पा शुक्रवारी २५ हजार तर निफ्टीचा ७,५०० पर्यंतचा नोंदला गेला. या दिवशी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची खरेदीही ३,६३४.८२ कोटी रुपयांची झाली. सोमवारी भांडवली वस्तू, ऊर्जा निर्देशांकांनी कमाई केली.
सेन्सेक्समध्ये सार्वजनिक क्षेत्रातील भेलचा समभाग तब्बल १७ टक्क्यांनी वधारला. कोल इंडिया, एनटीपीसीलाही दुहेरी आकडय़ातील वाढ फळफळली. टाटा पॉवर, हिंदाल्को, एल अॅण्ड टी, स्टेट बँक, अॅक्सिस बँक यांचेही समभाग मूल्य वाढले. माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्मिती कंपन्यांच्या समभाग मूल्यांवर दबाव राहिला.
केंद्रात येणाऱ्या स्थिर सरकारमुळे देशाचे पतमानांकन उंचावण्याच्या आशेनेही बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्समधील १९ समभागांचे मूल्य उंचावले. स्मॉल कॅप व मिड कॅपही अनुक्रमे ४.१९ व ५.८२ टक्क्यांनी वधारले. भक्कम होणारे चलनही निर्देशांकाला गती देऊन गेले.
निर्देशांकांची विक्रमी चाल कायम
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत लोकशाही आघाडीचे स्थिर सरकार आता केव्हाही विराजमान होण्याच्या स्थितीत असताना त्याच्या आशेवरचा भांडवली बाजाराच्या तेजीचा प्रवास अद्यापही संपलेला नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-05-2014 at 01:11 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Positive impact of election results on captial market