पोस्ट ऑफिस सर्व वर्ग आणि वयोगटातील लोकांसाठी बचत योजना चालवते. या योजनांमध्ये लोकांची गुंतवणूक सुरक्षित तर आहेच शिवाय चांगला परतावाही मिळतो. पोस्ट ऑफिसच्या ६० वर्षांवरील लोकांसाठी चालवल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये पोस्ट ऑफिस ७.४ टक्के दराने व्याज देते. तुम्हालाही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर त्याचे तपशील जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

SCSS योजनेत गुंतवणूक करण्याचे नियम

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय ६० वर्षे असणे आवश्यक आहे. तुम्ही वयाच्या ५५ ​​व्या वर्षी VRS घेतले असले तरीही तुम्ही पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करू शकता. या पोस्ट ऑफिस योजनेतील गुंतवणूक किमान १००० हजार रुपयापासून सुरू केली जाऊ शकते आणि त्याचा लॉक कालावधी ५ वर्षांचा आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक १५ लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही.

८ लाखांच्या गुंतवणुकीवर १०.९६ लाख रुपये होतील उपलब्ध

पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक योजनेत तुम्ही एकरकमी ८ लाख रुपये जमा केल्यास, तुम्हाला वार्षिक ७.४ टक्के चक्रवाढ व्याज मिळेल. ज्यामध्ये तुम्ही ५ वर्षात केलेली गुंतवणूक १० लाख ९६ हजार रुपये होईल. अशा स्थितीत तुम्हाला ५ वर्षांत २ लाख ९६ हजार रुपयांचा नफा मिळेल.

SCSS योजनेत आहे कर सूट उपलब्ध

सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये तुमचे वार्षिक व्याज १०,०००रुपयापेक्षा जास्त असल्यास, TDS कापला जातो. दुसरीकडे, या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कलम ८०C अंतर्गत सूट मिळते. याशिवाय पती-पत्नी दोघेही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत संयुक्त खाते उघडू शकतात. परंतु या खात्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपयेच गुंतवले जाऊ शकतात.

जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक खाते ५ वर्षापूर्वी बंद केले, तर तुमच्या ठेवीतील १.५% रक्कम १ वर्षात कापली जाईल. तर तुम्ही २ वर्षांनी ते बंद केले तर ठेव रकमेतील १ % कपात केली जाईल.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Post office if you invest 8lakhs in scss scheme you get more than 10 lakhs in 5 years scsm