देशाच्या ऊर्जा क्षेत्राविषयक ‘ऑईल अँड गॅस इंडिया २०१५’ या तीन दिवसांच्या राष्ट्रीय संमेलनात केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत या क्षेत्राला वाहिलेल्या ‘पॉवर स्ट्रीम’ या विशेषांकाचे अनावरण करण्यात आले. देशाच्या आगामी अर्थभरारीत पायाभूत सोयीसुविधा क्षेत्राचा विकास त्यातही ऊर्जेच्या विविध स्रोतांच्या योगदानाचा सर्वागीण वेध त्यात घेण्यात आला आहे. इंडिया टेक फाऊंडेशन (आयटीएफ)ने आयोजित केलेल्या या राष्ट्रीय संमेलनात, पॉवर स्ट्रीमच्या प्रकाशनाप्रसंगी केंद्रीय मंत्र्यांसोबत, ओएनजीसी विदेश लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी नरेंद्र वर्मा, आयटीएफचे अध्यक्ष इंद्र मोहन आणि केर्न इंडिया लि. व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी मयांक आशर उपस्थित होते.

Story img Loader