सार्वजनिक क्षेत्रातील पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. ७८.८० कोटी समभागांच्या खुल्या विक्रीचा गुरुवारी म्हणजे दुसऱ्या दिवशीच भरणा जवळपास पूर्ण झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ७८.६१ कोटी समभागांसाठी बोली लावणारे अर्ज गुंतवणूकदारांकडून दाखल झाले आहेत.
ऊर्जा क्षेत्रातील दुसरी सरकारी कंपनी ‘एनटीपीसी’च्या करमुक्त रोखेविक्रीचाही मुदतीच्या कैक दिवस आधीच भरणा पूर्ण झाला आहे. या १,००० कोटी रुपयांच्या रोखे विक्रीला ३.३ पट अधिक प्रतिसाद मिळत एकूण ३,३१० कोटी रुपये जमा झाले असल्याचे कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य धाटणीची ही रोखे विक्री आहे.
प्रति समभाग ८५ ते ९० रुपये किमतीला सुरू असलेल्या या भागविक्रीतून पॉवरग्रिडमधून केंद्र सरकारचा भांडवली वाटा सौम्य होणार असून, ७५०० कोटी रुपये उभे राहणे अपेक्षित आहे. वैयक्तिक छोटय़ा गुंतवणूकदारांना पाच टक्के सवलत किमतीत बोली लावता येईल. वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी भागविक्रीचा शुक्रवार, ६ डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा