गत २० महिन्यांपासून प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत असलेले प्रमोद कर्नाड यांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अधिकृतपणे नियुक्तीची करण्यात आली आहे. बँकेच्या प्रशासकीय मंडळाने अलीकडेच तशी घोषणा केली. शिखर बँकेचे संचालक मंडळ निष्कासित झाले असताना, रिझव्र्ह बँकेकडून बँकिंग परवाना प्रतिक्षित असतानाच्या खडतर काळात कर्नाड यांच्या नेतृत्वाखाली बँकेचा व्यावसायिक आराखडा तयार करण्यात आला. बँकेने तोटा पूर्णपणे भरून काढून ३१ मार्च २०१२ अखेर रु. १२५ कोटींचा निव्वळ नफा कमावण्याची कामगिरीही करून दाखविली. चार कादंबऱ्या आणि एक कविता संग्रह पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या कर्नाड यांच्या साहित्याला अनेक पुरस्कारही लाभले आहेत.
प्रमोद कर्नाड शिखर बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी
गत २० महिन्यांपासून प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत असलेले प्रमोद कर्नाड यांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अधिकृतपणे नियुक्तीची करण्यात आली आहे. बँ
First published on: 20-11-2012 at 04:45 IST
TOPICSअर्थसत्ता
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pramod karnad managing director on shikhar bank