मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची पुन्हा निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम दळवी यांची निवड करण्यात आली. या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या असून दरेकर पाचव्यांदा बँकेचे अध्यक्ष झाले. नुकत्याच झालेल्या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणीत सहकार पॅनल विजयी झाले. शिवसेनेचे या निवडणुकीत पानिपत झाले. २१ पैकी १७ जागांवर सहकार पॅनल विजयी झाले. बुधवारी संचालक मंडळाची बैठक पार पडली. दरेकर व दळवी हे दोघेही सहकार क्षेत्रात २५ वर्षे कार्यरत असून दरेकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेली ही निवडणूक भाजपविरुद्ध शिवसेना अशी होती. निवडणुकीत भाजपप्रणित सहकार पॅनल विजयी झाल्यामुळे सहकारात पाय रोवण्याच्या दृष्टीने भाजपने मुसंडी मारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘साण्डू पुरस्कारा’ने वैद्यक सन्मानित
व्यापार प्रतिनिधी, मुंबई<br />११६ वर्षांची दैदिप्यमान वाटचाल करणाऱ्या ‘साण्डू’ आयुर्वेद कंपनीच स्थापना दिनानिमित्त मुंबईत झालेल्या एका सोहळ्यात समूहामार्फत वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्या वैद्यांचा गौरव करण्यात आला. केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ‘साण्डू आयुर्वेद गौरव’ व ‘साण्डू आयुर्वेद भूषण’ पुरस्कारांनी यावेळी अनेकांना सन्मानित केले गेले. गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे कुलगुरू पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा यांचा विशेष सत्कारसुद्धा यावेळी केला गेला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin darekar fifth time chief of mumbai bank