मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रवीण दरेकर यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश पांडुरंग शिरवाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुंबई शहराचे उपजिल्हाधिकारी संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत आमदार दरेकर व शिरवाडकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. १९९९ पासून दरेकर बँकेच्या संचालक मंडळावर असून त्यांनी तीनवेळा बँकेचे अध्यक्षपद भूषवले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in