सध्या असलेल्या आर्थिक मंदीचे चित्र लवकरच पालटेल, असा आशावाद व्यक्त करतानाच केवळ शिक्षणासारख्या सक्रिय घटकांवरच ९ टक्के विकास दराचे उद्दिष्ट गाठले जाऊ शकते, असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला.
पहिल्या अभियांत्रिकी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, सध्या अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेतून प्रवास करत आहे. मात्र लवकरच ते चित्र पालटेल. घसरती अर्थव्यवस्था निश्चितच स्थिरावेल. मात्र १२ व्या पंचवार्षिक योजनेत दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे देशाचा विकास दर ९ टक्केप्रमाणे गाठावयाचा झाल्यास शैक्षणिक क्षेत्रासारख्या अन्य महत्त्वाच्या क्षेत्रातील योगदान वाढविले पाहिजे.

Story img Loader