Gold- Silver Price Today : कालच्या तुलनेत आज सोनेच्या दरामध्ये कोणताच बदल झाला नसून चांदीच्या दरामध्ये किंचत घट झाली आहे. कालप्रमाणेच आजही २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७,५१० प्रति १० ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदीचे दर २० पैशांनी पडले आहेत. ५५,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,५१० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,८३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,५४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,८६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,५४० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,८६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,५४० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,८६० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५५४ रुपये आहे.

mahada house prices increased instead of decreasing
म्हाडा घरांच्या किमतीत वाढ, अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ऐनवेळी किंमतीत बदल करण्याची वेळ
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
MHADA Lottery 20 percent of house price given MHADA housing scheme Maharashtra government
२० टक्क्यांतील घरांच्या वाढीव किमतीवर नियंत्रण! प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत
betel leaves expensive, betel leaves,
विड्याची पाने का महागली ? जाणून घ्या, अतिवृष्टी, संततधारेचा परिणाम काय?
Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
flood in wardha river
ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.