कर्जपातळीबाबत चिंतेतून निती आयोगाची शिफारस

सार्वजनिक नागरी हवाई सेवा कंपनी एअर इंडियावरील कर्जाची पातळी ही मुळीच शाश्वत नसून तिचे खासगीकरण आवश्यकच आहे, असे आपल्या शिफारशीचे समर्थन निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी गुरुवारी केले. केंद्र सरकार एअर इंडियाचे भवितव्य येत्या सहा महिन्यात ठरवेल, असेही त्यांनी सांगितले.

Share Market Budget 2025
India Budget 2025 Updates : तुमच्याकडेही आहेत का हे शेअर्स? अर्थसंकल्प जाहीर होताच झोमॅटोसह ‘या’ स्टॉक्समध्ये तेजी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Budget 2025 Kisan Credit Card benefits
Budget 2025 Kisan Credit Card : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मिळालं मोठं गिफ्ट; किसान क्रेडिट कार्डबाबत घेतला मोठा निर्णय
Narendra Modi
Narendra Modi : देश आता ‘मिशन मोड’मध्ये; अर्थसंकल्पाच्या आधीच मोदींनी सांगितली विकसित भारतासाठी त्रिसुत्री!
Loksatta Analysis in Mulund Control inflation through budget mumbai new
अर्थसंकल्पातून महागाईवर नियंत्रण कितपत?उद्या सायंकाळी मुलुंडमध्ये ‘लोकसत्ता विश्लेषणा’तून वेध
Reserve Bank application for Aviom bankruptcy proceedings
‘एव्हिओम’च्या दिवाळखोरी प्रक्रियेसाठी रिझर्व्ह बँकेचा अर्ज
Liquidity deficit in indian banking system hits lowest level in nearly 15 years
भारतीय बँकिंग व्यवस्थेची तरलता १५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर… खडखडाटामुळे कर्जे आणखी महागणार?
CIDCO HOMES APPLICATION LAST DATE
Cidco Scheme Deadline: ‘सिडको’नं परवडणाऱ्या घरांसाठी अर्जाची मुदत वाढवली, आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज!

सुमारे ५२,००० कोटी रुपयांचा कर्जभार असलेल्या एअर इंडियाच्या खासगीकरणाची शिफारस निती आयोगाने केली आहे. कंपनीवरील कर्जभारात वर्षांला ४,००० कोटी रुपयांची भर पडत असल्याचेही ते म्हणाले.

एअर इंडिया खासगीकरणासह अनेक पर्याय चाचपडून पाहत असल्याचे नमूद करत पानगढिया यांनी कंपनीसाठी काही खासगी कंपन्या उत्सुक असल्याचे म्हटले आहे. एअर इंडियामधील मोठा हिस्सा खरेदी करण्यास टाटा समूहाचे अध्वर्यू रतन टाटा उत्सुक असल्याची चर्चा आहे. पानगढिया यांनी मात्र याबाबत काहीही स्पष्ट केले नाही. एअर इंडिया आता खासगी उद्योगांच्या हातात देणेच योग्य ठरेल, एवढेच निती आयोगाचे उपाध्यक्ष पानगढिया म्हणाले.

एअर इंडियाचे खासगीकरण येत्या सहा महिन्यात होऊ शकेल, असे संकेत त्यांनी दिले. चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी, मार्च २०१८ पर्यंत याबाबतची प्रक्रिया पूर्ण करता येईल, असेही त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसात याबाबत सरकारकडून पावले टाकली जातील, असेही ते म्हणाले.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दुसऱ्या टप्प्यातील सरकारच्या कालावधीत एअर इंडियाला ३०,००० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले होते. विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही एअर इंडियाच्या खासगीकरणाबाबत यापूर्वीच समर्थन व्यक्त केले आहे.

 

Story img Loader