राष्ट्रीयकृत देना बँकेने गृह तसेच वाहन कर्जावर दिले जाणाऱ्या कर्जासाठीचे प्रक्रिया शुल्क मर्यादित कालावधीसाठी रद्द केले आहे. याचबरोबर बँकेने वैयक्तिक तसेच सोन्यावरील कर्जासाठीचे शुल्कही माफ केले आहे. नव्याने कर्ज घेणाऱ्यांसाठी ही योजना ३१ डिसेंबरअखेपर्यंतच लागू असेल. बँकेने २ कोटी रुपयेपर्यंतच्या व्यापार वित्त योजनांसाठीचे प्रक्रिया शुल्क ५० टक्के सवलतीने देऊ केले आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनाही याचप्रमाणे त्याचा लाभ घेता येईल. बँकेचे सध्या गृहकर्ज व्याजदर १०.४५ ते ११ टक्के दरम्यान आहेत. तर बँक वार्षिक ११ ते १२ टक्के व्याजदर वाहन कर्जासाठी आकारते. वैयक्तिक कर्ज व्याजदर १३ ते १४ टक्क्यांपर्यंत आहे.
देना बँकेच्या गृह, वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ
राष्ट्रीयकृत देना बँकेने गृह तसेच वाहन कर्जावर दिले जाणाऱ्या कर्जासाठीचे प्रक्रिया शुल्क मर्यादित कालावधीसाठी रद्द केले आहे. याचबरोबर बँकेने वैयक्तिक तसेच सोन्यावरील कर्जासाठीचे शुल्कही माफ केले आहे. नव्याने कर्ज घेणाऱ्यांसाठी ही योजना ३१ डिसेंबरअखेपर्यंतच लागू असेल. बँके
First published on: 05-12-2012 at 05:01 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Processing charges exempted for home vehicle load by dena bank