सुमारे २० वर्षांपूर्वीचा काळ आठवतो. १९९२ ते १९९४ या काळात शेअर बाजारातील व्यवहारांनी उच्चांक गाठला होता. जो उठतो तो शेअर खरेदी करत होता. मग ती एखादी कचरा कंपनी का असेना! कारण कुठच्या तरी कंपनीचे शेअर असणे हे जणू प्रतिष्ठेची बाब झाली होती. शेअर बाजाराविषयी चच्रेत मी भाग घेऊ शकत नसेन तर मी अडाणी अशी भावना मूळ धरू लागली होती. अर्थात अशा वेळी बँकिंगचे व्यवहारदेखील वाढणे हे ओघानेच आले. बँक ऑफ इंडियाची स्टॉक एक्स्चेंज शाखा ही कार्यभाराने इतकी ओथंबली होती की, एक दिवस असा आला की सुमारे ४५,००० व्हाऊचर (धनादेश वगरे) जमा झाले. त्याची डाटा एन्ट्री करणे एका दिवसात अशक्य झाल्याने गठ्ठे बांधून ठेवावे लागत. सर्व कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करीत असूनही ही अवस्था होती. त्यानंतर मग तातडीने बँकेने ‘फ्लॉपी पोिस्टग’ ही प्रणाली कमालीच्या त्वरेने वापरात आणली आणि मग १,००० व्हाऊचर अगदी पाचच मिनिटांत पोस्ट होऊ लागले. बीएसईच्या वतीने या सर्व प्रगत प्रणालीची अंमलबजावणी होत असताना त्याचा एक घटक म्हणून मला काही योगदान देता आले याचा अभिमान वाटतो. मात्र इतक्या तातडीने (सहसा राष्ट्रीयीकृत बँकांना वेग मानवत नाही!) हे ‘फ्लॉपी पोस्टिंग’ तंत्रज्ञान तयार करण्याचे एक मानकरी होते जबरदस्त तळमळीने मेहनत करणारे बँक ऑफ इंडियाच्या संगणक विभागाचे प्रमुख प्रमोद देशपांडे. परिस्थितीची निकड पाहून त्यांनी केवळ कामच करून घेतले नाही तर स्वत: रात्र रात्र जागून ‘प्रोग्रॅम’ लिहिला, कारण ती काळाची गरज होती. इतके प्रगत तंत्रज्ञान वापरणारी त्या वेळी ही पहिली राष्ट्रीयीकृत बँक होती. आता ‘सीटीएस’ म्हणजे ‘चेक ट्रंकेशन सिस्टीम’ अमलात आली. ही तर तंत्रज्ञानाची परिसीमाच!
तोच प्रकार ‘सीडीएसएल’ या डिपॉझिटरीत घडत आहे. गुंतवणूकदार जेव्हा शेअर विकतो तेव्हा त्याला शेअर ब्रोकरच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करण्यासाठी ‘डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप’ भरून ती डीपीकडे द्यावी लागते. अर्थात हे करायला वेळ नसेल तर डिमॅट खातेदार आपल्या ब्रोकरला ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’ देऊ शकतो. हा दुसरा पर्याय झाला. तेही करायचे नसेल तर easiest हा पर्याय वापरून म्हणजेच ‘इंटरनेट सेवा’ वापरून आपण थेट आपल्या खात्यातून ब्रोकरच्या खात्यात शेअर हस्तांतरित करू शकतो. मात्र आता तीनही पर्याय मागे पडले कारण अत्याधुनिक अशी प्रणाली म्हणजे TRUST चा जन्म झाला आहे!
ट्रस्टचा अर्थ Transactions Using Secured Texting. ‘सीडीएसएल’ने गुंतवणूकदारांना ही सोय उपलब्ध केली आहे. भांडवली बाजारात शेअर विक्रीचा व्यवहार झाला की, संबंधित ब्रोकरच्या नावे एक डु’Obligation file बनते जी तो ब्रोकर ‘सीडीएसएल’ यंत्रणेत अपलोड करतो. त्यानंतर ‘सीडीएसएल’ आपल्या डिमॅट खातेदाराला एक एसएमएस पाठवते- अमूक इतके शेअर तुम्ही देय आहात. या एसएमएसला होय असे उत्तर खातेदाराने दिले की, तितके शेअर त्याच्या डिमॅट खात्यातून वजा होतील आणि ब्रोकरच्या खात्यात जमा होतील. केवळ मोबाइलद्वारे हा व्यवहार होतो. ना इन्स्ट्रक्शन स्लिप की easiest!! बरे एसएमएसला तुम्ही उत्तर दिले नाही तर ठरावीक वेळेनंतर परत एसएमएस येत राहतील स्मरण देण्यासाठी! गुंतवणूकदाराला ही सेवा विनामूल्य आहे. अर्थात हे सर्व इतके त्वरित होण्यासाठी काही प्राथमिक बाबी आवश्यक आहेत. त्या म्हणजे डिमॅट खातेदाराने या सेवेसाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. शिवाय GPRS सुविधा असलेला मोबाइल असणे आवश्यक आहे. सध्या ही सेवा अँड्रॉइडसमर्थ मोबाइलवर कार्यरत असून लवकरच iPhone, Blackberry वगरे वरदेखील सुरू केली जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा