डिसेंबरपासून करवजावटीसाठी गुंतवणुकीचे पर्याय शोधण्यासाठी विशेषत: पगारदार वर्गाची सुरू होणारी घाई-गडबड पाहता, अनेक म्युच्युअल फंड हाऊसेसच्या नव्या योजना येत्या काळात दाखल होऊ घातल्या आहेत. विशेषत: पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्या छोटय़ा गुंतवणूकदारांना आकर्षिण्यासाठी संकल्पिलेल्या ‘राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम (आरजीईएसएस)’वर बेतलेल्या योजना आणण्यासाठी ‘सेबी’कडे दोन प्रस्ताव दाखल झाले आहेत.
बिर्ला सन लाइफ आणि सुंदरम म्युच्युअल फंड या दोन फंड हाऊसेसकडून ‘आरजीईएसएस’वर बेतलेली कर-वजावटीची योजना बाजारात आणण्यासाठी ‘सेबी’कडे अर्ज सादर झाले आहेत. नजीकच्या काळात अन्य फंड हाऊसेसही या धर्तीच्या योजनांसाठी ‘सेबी’कडे अर्ज घेऊन जाणे अपेक्षित आहे.
कोणतीही नवीन योजना बाजारात आणण्याआधी ‘सेबी’कडे त्या संबंधाने मसुदा प्रस्ताव सादर करणे बंधनकारक असून, असा अर्ज दाखल झाल्यावर साधारणपणे तीन ते चार आठवडय़ांत प्रत्यक्षात योजनेची खुली विक्री सुरू केली जाते.
सध्याच्या घडीला ‘आरजीईएसएस’अंतर्गत कर-वजावटीचा लाभ देणाऱ्या २० म्युच्युअल फंड योजना सुरू आहेत. परंतु सध्या शेअर बाजाराचा उच्चांकी बहर पाहता मार्च २०१४ पर्यंत आणखी अनेक योजना बाजारात येण्याची शक्यता विश्लेषक वर्तवीत आहेत. ‘आरजीईएसएस’अंतर्गत वार्षिक १० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना पहिल्यांदाच शेअर बाजारात होणाऱ्या कमाल ५० हजार रुपये गुंतवणुकीवर थेट २५ हजार रुपये इतकी कर-वजावट मिळविता येईल.
‘आरजीईएसएस’साठी दोन म्युच्युअल फंडांचे प्रस्ताव ‘सेबी’कडे दाखल
डिसेंबरपासून करवजावटीसाठी गुंतवणुकीचे पर्याय शोधण्यासाठी विशेषत: पगारदार वर्गाची सुरू होणारी घाई-गडबड पाहता, अनेक म्युच्युअल फंड हाऊसेसच्या नव्या योजना येत्या काळात दाखल होऊ घातल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-11-2013 at 12:07 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proposal for two mutual funds for rjess enter to sebi