अ‍ॅफोर्डेबल हाऊसिंग वेल्फेअर ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सोसायटीज् वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २० मार्च रोजी दुपारी २ वाजता इंडियन र्मचट्स चेंबरच्या इमारतीत प्रस्तावित विकास आराखडा या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावित नवीन विकास आराखडा आणि विकास नियंत्रण नियमावलीशी संबंधित म्हाडा, खाजगी इमारती, क्लस्टर, झोपु योजना यांसारख्या विविध विषयांवर वास्तूरचनाकार अनिल देरशेतकर, वास्तूरचनाकार मुकुंद गोडबोले, अ‍ॅफोर्डेबल हाऊसिंग वेल्फेअर ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश प्रभू तसेच अन्य तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत. इंडियन र्मचट्स चेंबरच्या दुसऱ्या मजल्यावरील बाबूभाई चिनाय कमिटी सभागृहात हा परिंसवाद होणार आहे.