आपण ‘फेसबुक’प्रेमी असल्याचे डॉ. रघुराम राजन यांनी रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरच्या रूपातील पहिल्याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. ‘‘मी फेसबुकवर ‘लाइक्स’ मिळविण्यासाठी काहीही बोलणार नाही; जे काही घडेल व मनाला पटेल तेच रिझव्र्ह बँकेच्या धोरणात उतरेल’’, असे त्यावेळी रोखठोक सांगणाऱ्या राजन यांच्या चाहत्यांची (लाइक्स) संख्या गेल्या महिन्याभरात मात्र प्रत्यक्षात ४८ हजारांवर गेली आहे. पहिल्या पतधोरणावर तमाम अर्थक्षेत्राने वास्तवात नाराजी व्यक्त केली असली तरी डॉ. राजन यांच्या ‘एफबी’वरील प्रत्येक ‘अपटेड’वर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा मोह तरुणांपासून थेट बँक कर्मचाऱ्यांपर्यंत सुटला नाही.
डॉ. राजन रिझव्र्ह बँकेचे ४ ऑगस्टपासून गव्हर्नर झाल्यापासून असंख्य फेसबुकप्रेमींनी या सोशल साईटवर त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. फेसबुकवर खाते (अकाउन्ट) असणाऱ्या राजन यांचा ‘पाठलाग’ (फॉलो) करणाऱ्याची संख्या महिन्यात ४८ हजारावर पोहचली आहे. http://www.facebook.com/Raghuram-Rajan हे त्यांचे फेसबुक पेज आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वाभाविकच लोकप्रिय असणारे राजन यांच्या चाहत्यांमध्ये १८ ते २४ वयोगटाचा सर्वाधिक भरणा आहे, तर सर्वात जास्त पसंती त्यांना दिल्लीतून मिळत आहेत.
भारताच्या आíथक जगतात घडणाऱ्या व मुख्यत्त्वे रिझव्र्ह बँकेशी संबधित विषयावर राजन नियमित ‘अपडेट’ करतात. सकाळी साधारणत: ९.३० च्या सुमारास पहिला अपडेट पडतो व दिवसभरात दोन ते तीन अपडेट त्यांच्या खात्यावर होतातच. हे अपडेट म्हणजे व्याजदर रोख्यांच्या परताव्याचे दर यांच्यासह रिझव्र्ह बँकेने जारी केलेल्या वेगवेगळ्या परिपत्रकाबरोबरच आंतरराष्ट्रीय घडामोडी या स्वरूपात असते. अनेकदा शेवटचे अपडेट रात्री १० नंतर, बहुधा ते झोपी जाण्यापूर्वी करतात. याबाबतचे ताजे उदाहरण म्हणजे ‘शून्य टक्के’ व्याजदर असणाऱ्या योजना बंद करण्यामागची कारणे सांगणारे अपडेट!’
‘इंदिरा गांधी अर्थशास्त्र विकास संस्था’ या रिझव्र्ह बँकेचाच एक भाग असलेल्या गोरेगाव, मुंबई येथील संस्थेतील पीएच.डी. करणारा एक विद्यार्थी राजन यांच्या फेसबुक खात्याबाबत म्हणतो, ‘वर्गात विचाराव्या अशा शंका मी राजनसरांना या संकेतस्थळाच्या माध्यमातून विचारतो व सरदेखील अनेक प्रश्नांची उत्तरे देतात व कोणते पुस्तक वाचावे याचेही मार्गदर्शनही करतात.’
सकाळी साधारणत: ९.३० च्या सुमारास पहिला अपडेट पडतो. व्याजदर, रोख्यांच्या परताव्याचे दर यांच्यासह रिझव्र्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रकांबरोबरच आंतरराष्ट्रीय घडामोडी या स्वरूपात दिवसभरात दोन ते तीन अपडेट होतातच. शेवटचे अपडेट रात्री १० नंतर..
राजन यांच्या चाहत्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या खालोखाल गृहिणी, बँक कर्मचारी यांचा क्रम आहे. राजन यांच्या चाहत्यांमध्ये जसे सामान्य लोक आहेत तशी अनेक वलयांकित व्यक्तिमत्त्वेही आहेत. अंजली गाडगीळ एका राष्ट्रीयीकृत बँकेत काम करतात. रिझव्र्ह बँकेची परिपत्रके त्या त्या खात्याकडे पाठविणे हे त्यांचे काम आहे. त्या म्हणतात, ‘आधी फक्त परिपत्रक येत असे व मी ते योग्य त्या खात्याकडे दिशादर्शनाकरिता पाठवीत असे. आजपर्यंत हे परिपत्रक केवळ शासकीय भाषेत असल्यामुळे त्यात विशेष असे काही नसे. परंतु राजन गव्हर्नर म्हणून आल्यापासून रात्री घरी गेल्यावरदेखील आज मिळालेले परिपत्रक का काढले हे वाचण्यासाठी फेसबुकवर जाते. राजन अगदी सोप्या शब्दात त्यांची व पर्यायाने रिझव्र्ह बँकेची भूमिका मांडत असतात. म्हणूनच काम करण्यातला उत्साह द्विगुणीत झाला आहे.
ठाण्याचे मििलद अंधृटकर म्हणाले, ‘राजन यांनी गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून मी त्यांचा फेसबुक फॉलोअर आहे आणि त्यांचे त्यावरील अपडेट वाचल्याशिवाय मी झोपायलाही जात नाही. एखादवेळेस रात्री अपडेट नसेल तर सकाळी उठल्याबरोबर त्यांच्या खात्यावर काहीतरी वाचायला मिळतेच. एका अर्थाने सामान्य लोकांशी त्यांची नाळ घट्ट आहे.
…तरी एफबी लाइक्स
आपण ‘फेसबुक’प्रेमी असल्याचे डॉ. रघुराम राजन यांनी रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरच्या रूपातील पहिल्याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.
First published on: 28-09-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raghu rajans facebook updates like by housewifeyouth and bank employee