देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असलेले डॉ. रघुराम राजन यांनी रिझव्र्ह बँकेचे नवे २३ वे गव्हर्नर म्हणून बुधवारी पदभार स्वीकारला. जगाला जागतिक वित्तीय अरिष्टाने घेरले असताना, म्हणजे २००८ सालात पंतपधानाचे आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून रघुराम राजन यांनी काम पाहिले होते.
अग्रलेख : रघुरामप्रहर
प्रशासकीय सेवेचा गाढा अनुभव घेऊन रिझव्र्ह बँकेत आलेले आणि दोन वेळा मुदतवाढ मिळालेले सुब्बराव अखेर आज (४ सप्टेंबर २०१३) रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ५० वर्षीय (जन्म : ३ फेब्रुवारी १९६३) राजन यांनी रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून आगामी तीन वर्षांसाठी सूत्रे हाती घेतली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवरील सर्वात तरुण मुख्य अर्थतज्ज्ञ राहिलेले राजन देशातील बँकांचे नियमन करणाऱ्या संस्थेचे प्रमुख म्हणूनदेखील आतापर्यंतचे सर्वात तरुण गव्हर्नर ठरले आहेत.
अर्थतज्ज्ञाच्या हाती अखेर देशाच्या पतधोरणाची धुरा ; डॉ. रघुराम राजन रिझव्र्ह बँकेचे २३ वे गव्हर्नर
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ६ ऑगस्ट रोजी भारतीय रिझर्व बॅंक (आरबीआई) चे गवर्नर म्हणून पुढील तीन वर्षांसाठी रघुराम राजन यांच्या नियुक्तिला मंजूरी दिली होती. देशासमोरील आर्थिक आव्हाने आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत होणारी रूपयाची घसरण ही प्रमुख आव्हाने राजन यांच्यासमोर आहेत. तसेच सिरिया युद्धाच्या चिंतेने भांडवली बाजाराबरोबरच रुपयावर आणखीनच दबाव निर्माण केला आहे. त्याला कसे तोंड द्यायचे हा तिढासुध्दा राजन यांना सोडवायचा आहे.
राजन उवाच..
* सध्याचा काळ खडतर आहे.
* चलनफुगवटय़ावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सर्वसमावेशक विकास आणि आर्थिक स्थैर्य राखणे हे रिझव्र्ह बँकेसमोरील आव्हान
* यापुढे नव्या शाखा सुरू करण्यासाठी बँकांना रिझव्र्ह बँकेच्या परवानगीची गरज नाही
* नव्या बँक परवान्यांचे वितरण जानेवारी २०१४ मध्ये करण्यात येणार
* नव्या बँक परवान्यांसाठी आलेल्या अर्जाची छाननी करण्यासाठी बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली समिती
* रुपयाच्या स्थैर्यासाठी अधिक प्रयत्नांची हमी
* चलनाच्या स्थिरतेसाठी प्रयत्न करणे हे आमचे मुख्य काम
* ‘स्टँडर्ड अँड पूअर’च्या क्रमवारीत नवीन असे काहीही नाही, त्याचा फार विचार करण्याची गरज नाही
* भारतीय अर्थव्यवस्थेचे भविष्य आशादायी आहे असे मानायला बरीच जागा
* पहिले धोरण २० सप्टेंबर रोजी
रघुराम राजन यांनी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला
देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असलेले डॉ. रघुराम राजन यांची रिझव्र्ह बँकेचे नवे २३ वे गव्हर्नर म्हणून आज (बुधवार) पदभार स्वीकारला.
First published on: 04-09-2013 at 03:19 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raghuram rajan takes charge as rbi governor