साचेबद्धता मोडून निरंतर नवीन पायंडय़ांची चुणूक नवे गव्हर्नर रघुराम राजन यांनी पदभार ग्रहण करून महिनाही उलटला नसताना अनेकवार दिली आहे. पहिले म्हणजे त्यांनी रिझव्र्ह बँकेचा नियोजित पतधोरण आढावा हा अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हचा कौल काय हे पाहून मुद्दामहून दोन दिवस विलंबाने घेण्याचे ठरविले. दुसरे, मध्य-तिमाही आढावा हा केवळ पानभराच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर न करता, त्यांनी प्रसारमाध्यमांना सामोरे जाऊन सर्व प्रश्न-शंकांची तड लावण्याचा नवीन प्रघात शुक्रवारी पाडल्याचे दिसून आले. रेपो दरात वाढ हे अर्थविकासासाठी नकारार्थी आणि नव्या गव्हर्नरांचा रोखही महागाई नियंत्रणावरच काय, या फिरून एकसारख्याच आलेल्या प्रश्नांना त्यांनी न कंटाळता शांतपणे संपूर्ण समाधान होईपर्यंत उत्तरे दिली आणि आपले धोरण सुस्पष्टपणे विशद केले. ‘‘सध्याची बाजारस्थिती अशी (अनिश्चित) आहे की, माझ्या हिंदीवर मला पुरता विश्वास नाही. पण वर्षभराची सूट द्या मी वचन देतो की हिंदीतून एक संपूर्ण मुलाखत देईन,’’ अशी सूचक विधाने करीत भविष्यातील सुकरतेबाबत आश्वस्त केले. पत्रकार परिषदेत राजन यांनी केलेल्या विधानांचे हे शब्दश: रूपांतर..
अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हने रोखे खरेदी कार्यक्रम गुंडाळणे लांबणीवर टाकले आहे आणि ही केवळ तात्पुरती स्थगिती आहे. आपल्याला मिळालेल्या या सवडीचा आपण देशाच्या आर्थिक ताळेबंदाला आणि विकास अजेंडय़ाला ‘बुलेट-प्रुफ’ (अभेद्य) बनविण्यासाठी आणि त्यायोगे आम नागरिकांचे तसेच गुंतवणूकदारांचे मनोबल उंचावण्यासाठी करायला हवा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा