तब्बल दीड वर्षांनंतर लागू झालेल्या रिझव्र्ह बँकेच्या व्याजदर कपातीची मात्रा गृह, वाहन कर्जदारांसाठी गोड संक्रांत भेट घेऊन आली. मध्यवर्ती बँकेच्या गुरुवार सकाळच्या रेपोदर कपातीनंतर युनियन बँक तसेच युनायटेड बँक ऑफ इंडियाने लगेचच पाव टक्के गृह कर्ज स्वस्ताईचा शुभारंभ केला. याचा कित्ता अन्य बँकांना गिरविणे भाग पडणार असून वर्षांरंभी महाग झालेल्या वाहन क्षेत्रालाही यातून दिलासा मिळणार आहे. परिणामी, गृह तसेच वाहन कर्जदारांच्या मासिक हप्त्यांची घडी अधिक व्यवस्थित बसण्यास मदत होणार आहे.

Story img Loader