एकीकडे महागाई वाढीचा आलेख वरच्या दिशेने जात असताना दुसरीकडे महत्त्वाच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल न करता रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बुधवारी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
मध्य-तिमाही पतधोरण आढाव्यात राजन सलग तिसऱयांदा रेपो दरात पाव टक्क्याने वाढ करण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, राजन यांनी ऐनवेळी ‘गुगली’ टाकत व्याजदरात कोणतीच वाढ न करण्याचे जाहीर केले. रिझर्व्ह बॅंकेचे सर्व व्याजदर कायम ठेवण्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजन यांच्या निर्णयामुळे उद्योजकांना आणि कर्जधारकांना दिलासा मिळाला आहे. रेपो दर ७.७५ टक्के कायम ठेवण्यात आला असून, रोकड राखीव निधी दरी ४ टक्के कायम ठेवण्यात आला आहे.
आगामी काळात महागाई दरवाढीचा अंदाज घेऊन पुढील पतधोरण आढाव्यावेळी व्याजदर वाढीचा विचार केला जाईल, असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले.