केवळ नवीन गुंतवणूकदारांसाठीच राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्स स्कीम आहे मग जुन्या म्हणजे प्रचलित गुंतवणूकदारांनी काय घोडे मारले आहे असा नाराजीचा सूर एस.एन. सानप यांच्याकडून आलेल्या पत्राने लावला आहे. या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहचविणे हे माझे काम आहे त्यामुळे योजनेवर बरी-वाईट टीका करणे हे माझे क्षेत्र नाही.
तसे पाहिले तर प्रचलित गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे अनेक पर्याय / योजना उपलब्ध आहेत ज्या या योजनेतील गुंतवणूकदारांना नाहीत!! पती आणि पत्नी असे संयुक्त डिमॅट खाते आहे ज्यात गुंतवणूक केलेली आहे. आता पत्नी स्वतच्या नावे RGESS खाते उघडून गुंतवणूक करू शकते का असेही त्यांनी विचारले आहे. याचे स्पष्ट उत्तर होय असे आहे. कारण पहिल्या खात्यात पत्नीचे नाव दुसरे आहे.
प्रचलित गुंतवणूकदार आपल्या डिमॅट खात्यातील सर्व शेअर्स विकून टाकून ते खाते बंद करीत असेल आणि नवीन खाते या योजनेच्या अंतर्गत उघडून नवीन गुंतवणूक करीत असेल तर ते चालू शकते का? याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. याच प्रकारचा प्रश्न संतोष यादव यांनी विचारला आहे की, ‘काव्र्ही’मध्ये असलेले त्यांचे खाते RGESS मध्ये रूपांतरीत करून मिळेल का? असे करता येणार नाही. अमृत पवार यांचे एकटय़ाच्या नावाचे डिमॅट खाते आहे ज्यात त्यांना आपल्या मुलाचे नाव संयुक्त खातेदार म्हणून टाकायचे आहे. एकदा डिमॅट खाते उघडले की, त्यात आणखी नाव सामील करता येत नाही. नवरत्न, महारत्न, मिनी रत्न या गटातील शेअर्सची यादी कुठे मिळेल असे अनेक वाचकांनी विचारले आहे, त्यांना http://dpe.nic.in/publications/list_of_maharatna_navratna-and_miniratna या वेबसाइटवर ही माहिती मिळू शकते.
ज्या लोकांची आधीच शेअर्समध्ये गुंतवणूक आहे त्या मंडळींच्या घरातील कुणीही अन्य व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकते अर्थात ती नवीन गुंतवणूकदार या व्याख्येत बसत असेल तर.
ज्या आíथक वर्षांत गुंतवणूक झाली असेल म्हणजेच डिमॅट खात्यात शेअर्स जमा झाले असतील त्या तारखेपासून एक वर्ष लॉक इन काळ मोजला जाईल. समजा आर्थिक वर्ष एप्रिल २०१२ ते मार्च २०१३ या वर्षांत एखाद्या व्यक्तीने १२ जानेवारी २०१३, ७ फेब्रुवारी २०१२ आणि २२ मार्च २०१३ अशी तीन वेळा गुंतवणूक केली तर २१ मार्च २०१४ या दिवशी ‘लॉक इन’चा काळ समाप्त होईल. ‘लॉक इन’चा काळ कधीपासून सुरू होतो असा प्रश्न येतो त्याचे उत्तर म्हणजे शेअर्स डिमॅट खात्यात जमा झाले की तात्काळ त्याला लॉक इन अशी स्थिती प्राप्त होते. याचा अर्थ १२ जानेवारी २०१३ रोजी घेतलेले शेअर्स एक वर्षांहून अधिक काळ लॉक इन मध्ये राहतील हे उघड आहे.
पहिल्या एक वर्षांचा लॉक इन काळ हा बंधनकारक आहेच. मात्र पुढील दोन वष्रे लवचिक लॉक इन असू शकतो. याचा अर्थ एकूण १८,००० रुपये किंमतीची गुंतवणूक केलेली असेल तर पुढील दोन वर्षांत त्यापकी समजा ६००० रुपये किंमतीचे शेअर्स गुंतवणूकदार विकू शकतो. मात्र एकूण गुंतवणूक तेवढय़ा प्रमाणात कमी झाल्याने तितक्याच म्हणजे ६००० रुपये किंमतीच दुसरे कुठल्याही कंपनीचे शेअर्स विकत घेतले पाहिजेत. अर्थात निर्धारीत यादीतील शेअर्स म्हणजे बीएसई १००, सीएनएक्स १०० वगरे. लगेचच घेतले पाहिजेत असे नाही तर किमान २७० दिवस तरी मूळ गुंतवणुकीच्या रकमेइतके शेअर्स खात्यात राहिले पाहिजेत. लवचिक लॉक इन काळातील दोन वर्षांपकी प्रत्येक वर्षी किमान २७० दिवस. अधिक खुलासेवार माहितीसाठी rgess@cdslindia.com या वेबस्थळाशी संपर्क साधता येईल.
अधिकाधिक लोकांपर्यंत ही योजना पोहचविण्यासाठी सेबीने सर्व संबंधित संस्थाना आवाहन केले आहे. त्यानुसार बीएसई, सीडीएसएल आणि बँक ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे गुरुवार, १० जानेवारीला सायंकाळी ४.३० वाजता बँकेच्या हुतात्मा चौक येथील मुख्य शाखेत एक दोन तासांची कार्यशाळा विनामूल्य आयोजित केली आहे.
काही ठळक प्रश्न
प्रश्न: या योजनेच्या अंतर्गत गटातील शेअर्स जर अगोदरच माझ्याकडे असतील व मी ते डिमॅट करून घेतले की ते गुंतवणूक म्हणून समजले जातील का
उत्तर: नाही. इथे नवीन गुंतवणूकदार डोळय़ासमोर ठेऊन योजना बनवली आहे.
प्रश्न: तीन वर्षांचा लॉक इन काळ पूर्ण झाला की पुढे काय होईल?
उत्तर: त्यानंतर डिपॉझिटरी ते खाते आपोआपच सर्वसाधारण खाते म्हणून समजेल व डेटबेसमध्ये तशी नोंद करील.
प्रश्न: गुंतवणूक केलेले शेअर्स काही काळानंतर त्या गटातून बाहेर काढले गेले तर मग गुंतवणूकीतून तितकी रक्कम वजा करून उरलेल्या रकमेवर कर सवलत मिळणार का?
उत्तर: तसे नाही. तुम्ही गुतवणूक करतेवेळी ते शेअर्स कर बचतीसाठी पात्र होते म्हणून ती सलवत तशीच चालू राहील कारण यात तुमचा काहीच दोष नाही.
राजीव गांधी इक्विटी योजना आणि ‘लॉक इन’ काळ
केवळ नवीन गुंतवणूकदारांसाठीच राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्स स्कीम आहे मग जुन्या म्हणजे प्रचलित गुंतवणूकदारांनी काय घोडे मारले आहे असा नाराजीचा सूर एस.एन. सानप यांच्याकडून आलेल्या पत्राने लावला आहे. या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहचविणे हे माझे काम आहे त्यामुळे योजनेवर बरी-वाईट टीका करणे हे माझे क्षेत्र नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-01-2013 at 12:45 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajiv gandhi equity saving scheme is it worth investing