मालदीवमधील भारताचे नवे उच्चायुक्त म्हणून राजीव शहारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आधीचे उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे यांना भारताचे न्युयॉर्कमधील कौन्सिल जनरल म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय कंपनी जीएमआरचे मालदीवमधील विमानतळ उभारणीचे कंत्राट रद्द झाल्याच्या पाश्र्वभूमिवर हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. शहारे हे सध्या केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पश्चिम आशिया-उत्तर आफ्रिका विभागाचे संयुक्त सचिव आहेत. तर मुळे हे नवे पद मार्च २०१३ मध्ये स्वीकारतील.    

Story img Loader