यंदा दर ३.२ टक्के; चार महिन्यात सर्वोत्तम
गेल्या चार महिन्यातच सर्वोत्तम विकास दर साधत देशातील प्रमुख क्षेत्रात सप्टेंबरमध्ये ३.२ टक्के वाढ नोंदली गेली आहे. खत उत्पादन व ऊर्जा निर्मिती या जोरावर प्रमुख आठ क्षेत्रांमध्ये यंदा वाढ पहायला मिळाल्याची आकडेवारी सोमवारी उशिरा जाहीर झाली.
कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट व ऊर्जा या क्षेत्रांचा प्रमुख निर्मिती क्षेत्रात वाटा असतो. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात ही आठ क्षेत्रे ३८ टक्के हिस्सा राखतात. वर्षभरापूर्वीच्या याच महिन्यात ती २.६ टक्के होती. यंदाच्या सप्टेंबरमधील दर हा गेल्या चार महिन्यातील सर्वाधिक ठरला आहे. यापूर्वी मेमध्ये ४.४ टक्के वाढ प्रमुख क्षेत्राने राखली होती.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या अर्ध वित्त वर्षांत, एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान प्रमुख क्षेत्राची वाढ २.३ टक्के असून ती वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ५.१ टक्क्य़ांपेक्षा मात्र यंदा कमी आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, खत उत्पादन १८.१ टक्क्य़ांनी वाढले आहे. यंदाच्या ऑगस्टमध्ये ते नकारात्मक, (-) ११.६ टक्के होते. तर ऊर्जा निर्मितीतील वाढ १०.८ टक्के राहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा