टाटा समूहातून येत्या महिनाअखेर निवृत्त होणारे रतन टाटा हे टाटा पॉवर कंपनीतून गुरुवारी पायउतार झाले. टाटा समूहातील या कंपनीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सायरस मिस्त्री यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आपले उत्तराधिकारी आणि समूहाचे अध्यक्ष म्हणून मिस्त्री यांचे नाव वर्षभरापूर्वीच जाहीर झाले आहे. दरम्यान समूहातून डिसेंबर २०१२ पर्यंत निवृत्त होईपर्यंत रतन टाटा हे टाटा पॉवरच्या संचालक पदावर राहणार आहेत. मिस्त्री हे टाटा पॉवरच्या संचालक मंडळावर गेल्याच वर्षी नियुक्त झाले होते. यापूर्वीही १९९६ पासून ते तब्बल १० वर्षे टाटा पॉवरमध्ये होते.   

Story img Loader