आयातीला आलेले उधाण फार काळ टिकणार नाही़ त्यामुळे बँकांनी त्यांच्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री पी़ चिदम्बरम यांनी बँकांना दिला आह़े सोन्यावरील आयात शुल्क ८ टक्क्यांपर्यंत वाढविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय बँक महासंघाच्या (आयबीए) वार्षिक सर्वसाधारण सभेत चिदम्बरम यांनी केलेल्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आह़े
चिदम्बरम पुढे म्हणाले की, ग्राहकांचा सोने खरेदीचा उत्साह कमी करण्यात बँकांना मोठी भूमिका बजावायची आह़े त्यामुळे मी सर्व बँकांना विनंती करतो की, त्यांनी त्यांच्या सर्व शाखांना सुवर्ण खरेदी आणि गुंतवणुकीसाठी ग्राहकांना प्रोत्साहन न देण्याचा सल्ला द्यावा़
रिझव्र्ह बँकेने याआधीच बँकांना सोन्याच्या नाण्यांची विक्री नियंत्रित करण्याचा सल्ला दिला आहे, त्याची आठवण करून देत चिदम्बरम म्हणाले की, असा दिवस येण्याची आशा वाटते जेव्हा आपण सोन्यालाही इतर धातूंप्रमाणेच एक धातू मानू, जो केवळ चांदी-तांब्यापेक्षा अधिक चमकतो इतकेच़
सोन्याची वाढती आयात देशाच्या चालू खात्यावरील तूटीत मोठी भर टाकत आह़े त्यामुळे सोन्याची आयात नियंत्रित करण्यासाठी शासनाने सोने आणि प्लॅटिनमच्या आयातीवरील कर दोन टक्क्यांनी वाढविला आह़े सोन्याच्या आयात शुल्कावर गेल्या सहा महिन्यांत करण्यात आलेली ही दुसरी वाढ आह़े जानेवारीमध्ये शासनाने हे आयात शुल्क ४ वरून ६ टक्क्यांवर आणले होत़े
वाटत्या कॅडबद्दल चिंता व्यक्त करीत अर्थमंत्री म्हणाले की, सोन्याची आयात वाढत्या कॅडला मोठा हातभार लावीत आह़े सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने लाखो लोक आनंदात आहेत़ परंतु, त्या लाखो लोकांमध्ये मी नाही़ मी चिंतेत आह़े जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण ही भारतासाठी वाईट बातमी असल्याचे मी आरबीआयच्या गव्हर्नरांनाही सांगितले आह़े आणि आमची भीती खरी ठरली़ एप्रिल – मेमध्ये सोन्याची विक्री वाढली़
याबद्दल माहिती देताना अर्थमंत्री म्हणाले की, एप्रिलमध्ये भारताने १४२ टन सोन्याची आयात केली होती़ तर मे महिन्यात सोन्याच्या आयातीचे प्रमाण १६२ टन इतके होत़े गेल्या वर्षी सोन्याच्या आयातीचे मासिक प्रमाण ७० टन होत़े मग आपण कसा टिकाव धरू शकणार? या सुवर्ण खरेदीला आपण वित्तसाहाय्य तरी कसे करणार? असे प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केल़े
त्यामुळे या सुवर्ण आयातीला चाप लावण्यासाठी कडक पाऊल उचलण्याविना आरबीआय किंवा शासनाला कोणताही पर्याय नाही़ त्यामुळे आरबीआयने मागणीनुसारच सोन्याची आयात करण्याचे बंधन घातले आह़े तसेच तारणही शंभर टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आह़े परकीय गंगाजळीला हातही न लावता, भारत आपले कॅड परकीय गुंतवणुकीतून फेडू शकेल, असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला़ चलन फुगवटय़ात होणारी घटही सोने खरेदीवरील लक्ष्य दुसरीकडे वळवू शकेल, असेही मत त्यांनी व्यक्त केल़े वाणिज्य बँकांना वित्तमंत्र्यांनी विनंती केली की, कंपन्या आणि कर्जदारांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देऊन वित्तीय धोरणे प्रत्यक्षात आणावीत़ जीडीपीच्या तुलनेत २०१२-१३ या वर्षांत वित्तीय तुटीचे प्रमाण ४.९ पर्यंत खाली आल्याचे सांगत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, वित्तीय तुटीचे येत्या वर्षांतील ४.८ टक्के उद्दिष्ट सहज साध्य असल्याचेही त्यांनी सांगितल़े
ग्राहकांना सुवर्णखरेदीपासून परावृत्त करा
आयातीला आलेले उधाण फार काळ टिकणार नाही़ त्यामुळे बँकांनी त्यांच्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री पी़ चिदम्बरम यांनी बँकांना दिला आह़े सोन्यावरील आयात शुल्क ८ टक्क्यांपर्यंत वाढविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय बँक महासंघाच्या (आयबीए) वार्षिक सर्वसाधारण सभेत चिदम्बरम यांनी केलेल्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आह़े
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-06-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi advised banks not to sell gold coins p chidambaram