घरखरेदीला चालना
माफक दरातील घर खरेदीला प्रोत्साहनाच्या सरकारच्या धोरणाला सुसंगत असा निर्णय रिझव्र्ह बँकेने गुरुवारी सायंकाळी घेतला. आता ३० लाख रुपये किमतीपर्यंतच्या घरासाठी ९० टक्क्यांपर्यंत गृहकर्ज ग्राहकांना मिळू शकेल. सध्या ही मर्यादा केवळ २० लाख रुपये किमत असलेल्या घरांपुरतीच होती. ती आता ३० लाख रुपयांपर्यंतच्या घरांसाठी विस्तारली असून याचा लाभ माफक दरातील घर खरेदीदारांना होऊ शकेल. सर्वसाधारणपणे माफक दरातील घरांचे मूल्य ४० लाख रुपयांपर्यंत गृहीत धरले जाते. ३० लाखांपुढे ते ७५ लाख रुपये दरम्यानच्या घरांसाठी मालमत्तेच्या मूल्याच्या ८० टक्क्यांपर्यंत गृहकर्ज मिळू शकेल. तर त्यावरील किमतीच्या घरासाठी ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज बँका तसेच वित्त संस्था देऊ शकतील. या मंजूर कर्ज मर्यादेव्यतिरिक्त रक्कम घर खरेदीदाराने उभी करावयाची असते.
३० लाखांपर्यंतच्या घरासाठी आता ९० टक्क्यांपर्यंत गृहकर्ज मिळणार
माफक दरातील घर खरेदीला प्रोत्साहनाच्या सरकारच्या धोरणाला सुसंगत असा निर्णय रिझव्र्ह बँकेने घेतला.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 09-10-2015 at 07:36 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi allows 90 percent loan to value ratio on home loans up to rs30 lakh