नागरी सहकारी बँकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या सोने तारण कर्जाच्या सध्याच्या मर्यादेत दुपटीने वाढ करून ती दोन लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय रिझव्र्ह बँकेने गुरुवारी जाहीर केला.
या प्रकारच्या कर्जासाठी रिझव्र्ह बँकेने काही शर्ती घातल्या आहेत. हे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तर कर्जाची मुद्दल व्याज रकमेसह तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याच्या बाजार मूल्याच्या ७५ टक्के इतकीच असण्याचेही बंधन आहे. शिवाय हे कर्ज १२ महिने मुदतीपेक्षा जास्त नसावे आणि व्याज आकारणी ही दरमहा केली जाणार असली तरी मुदतपूर्तीअखेर म्हणजे १२व्या महिन्यात संपूर्ण वर्षांला व्याज रक्कमही जमेला धरून ग्राहकांची मुद्दल परतफेड होईल, याची बँकांनी खातरजमा करावी लागेल.
विमानतळ प्राधिकरणाचे रवींद्र कुमार श्रीवास्तव नवीन अध्यक्ष
व्यापार प्रतिनिधी, मुंबई<br />भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय)चे अध्यक्ष म्हणून रवींद्र कुमार श्रीवास्तव यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. १९८४ सालचे झारखंड तुकडीतील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले श्रीवास्तव हे या नव्या नियुक्तीपूर्वी झारखंडमध्ये नियोजन व विकास आणि ऊर्जा मंत्रालयाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. त्या आदी त्यांनी भारत सरकारच्या गृहमंत्रालयात उपसचिव म्हणूनही कारकीर्द राहिली आहे. अध्यक्षपदाचा कारभार हाती घेताच त्यांनी प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची कामाचा आढावा घेणारी बैठक घेतली.