सोन्याची नाणी तसेच पदके आयात करण्याचा मार्ग पुन्हा एकदा खुला झाला आहे. निवडक अटींवरच विदेशातून मौल्यवान धातूची नाणी आणि पदके आणण्यास बँका तसेच सराफ व्यावसायिकांना मुभा देण्यात आली आहे.
सरकारच्या तिजोरीवर भार ठेरणाऱ्या व वाढत्या वित्तीय तुटीला निमित्त ठरणाऱ्या मौल्यवान धातूच्या आयातीवर ऑगस्ट २०१३ मध्ये रिझव्र्ह बँकेने र्निबध लादले होते. यानंतर २८ नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात त्यात शिथिलता आणली होती.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आठवडय़ाचा कालावधी असताना मौल्यवान धातूवरील उत्पादन शुल्क कमी केले जावे, अशी उद्योगजगताकडून मागणी होत असतानाच रिझव्र्ह बँकेने आधीच एक पाऊल पुढे टाकत सोन्यावरील र्निबध काहीसे शिथिल केले.
व्यापाऱ्यांना तसेच बँकांना देशांतर्गत व्यवहारासाठीच आता सोन्याची नाणी व पदकांची आयात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोने कर्जाची बँकांची मुभाही कायम आहे.
जानेवारी २०१५ मध्ये भारताची सोन्याची आयात वार्षिक तुलनेत ८.१३ टक्क्यांनी वाढली आहे. तर केंद्रीय खनिकर्म खात्याच्या अंदाजाने २०१३-१४ मध्ये सोन्याची निर्मिती १,४११ किलो होण्याची शक्यता आहे.
सोने आयात र्निबध शिथिलतेनंतर मौल्यवान धातूची मागणी वाढण्याची शक्यता आहे. र्निबधामुळे चोरटी आयात वाढल्याचे यापूर्वीच उत्पादकांनी नमूद केले आहे.
मौल्यवान धातूच्या दरांतही गेल्या काही दिवसांमध्ये अस्वस्थ हालचाल नोंदविली गेली आहे. सोन्याचे दर तोळ्यामागे २७ हजार रुपयांपुढे असताना बुधवारी अचानक त्यात कमालीचा उतार नोंदला गेला.
अर्थसंकल्पात सोन्यावरील १० टक्के उत्पादन शुल्क कमी होण्याची या उद्योगाला आशा आहे. हे कर कमी होण्याचा पाठपुरावा केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयानेही अर्थखात्याकडे धरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा