भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने नवीन बँक परवाने अदा करण्याचा निर्णय लवकर तडीस नेण्यासाठी मुख्यालयात अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारताच जानेवारीअखेर याबाबत निर्णय होईल, अशी घोषणा करणाऱ्या डॉ. राजन यांनी २० कर्मचाऱ्यांचा एक चमूच तयार केला आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्राथमिक स्तरावर चाळणी लावल्यावर पुढील मूल्यमापनासाठी हे अर्ज रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या अध्याक्षेतेखालील समितीपुढे ठेवण्यात येतील. रिझव्‍‌र्ह बँकेचे खाते बँकिंग परिचलन व विकास खात्यातील २० कर्मचारी असलेल्या एका गटाकडे हे काम सोपविण्यात आले आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आनंद सिन्हा रोज याचा आढावा घेत असतात. या कर्मचाऱ्याची विभागणी चार उप गटात केली असून प्रत्येक गटाचे नतृत्व एक महाव्यवस्थापक करत आहे. या घडामोडींची जवळून माहिती असणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या सूत्राकडून कळलेल्या माहितीनुसार शनिवार व रविवार हे या कर्मचाऱ्यासाठी कामाचे दिवसच आहेत.
मागील आठवडय़ात झालेल्या एका या कर्मचाऱ्यांच्या बठकीत रिझव्‍‌र्ह बँकेचे कार्यकारी संचालक व या कर्मचाऱ्यांच्या समुहाचे नेते बी. महापात्रा औद्योगिक घराण्यांना परवाने द्यावेत अशी भूमिका घेतली. कारण बँका हा व्यवसाय खाíचक असून आíथक सर्व समावेशनासाठी दीर्घकाळ या व्यवसायात टिकून रहाण्याची गरज असल्यामुळे औद्योगिक घराण्यांना परवाने वितरीत करावेत अशी भूमिका त्यानी घेतली.मार्गदर्शक तत्वे व लोकसभेत बँकिंग  सुधारणा विधेयक  २०११मंजुरीमुळे रिझव्‍‌र्ह बँकेला मिळालेले अधिकार यामुळे जरी या औद्यगिक घराण्यांना परवाने वितरित झाले तरी त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन बँक अनुज्ञापत्रातील टप्पे :
२०१०
२६ फेब्रुवारी : तत्कालीन अर्थमंत्र्यांची नवीन बँक परवान्यांसाठी अर्ज मागविण्याची घोषणा
११ ऑगस्ट  : रिझव्‍‌र्ह बँकेकडून या विषयावर पथदर्शक अहवाल प्रसिद्ध  
२३ डिसेंबर : रिझव्‍‌र्ह बँकेकडून या अहवालावरील सूचना प्रसिद्ध  
  २०११
२९ ऑगस्ट : रिझव्‍‌र्ह बँकेकडून मार्गदर्शक तत्वाचा मसुदा प्रसिद्ध
 २०१२
१० जुल : रिझव्‍‌र्ह बँकेकडून मार्गदर्शक तत्वावर प्राप्त झालेल्या सूचना प्रसिद्ध
१८ डिसेंबर : लोकसभेत बँकिंग  सुधारणा विधेयक २०११ मंजूर
 २०१३
२४ फेब्रुवारी : रिझव्‍‌र्ह बँकेकडून बँकिंग परवाने देण्याचे निकष प्रसिद्ध
३ जून : रिझव्‍‌र्ह बँकेकडून बँकिंग वरील निकषांवर प्राप्त झालेल्या गोष्टींवर स्पष्टीकरण प्रसिद्ध
१ जुल : रिझव्‍‌र्ह बँकेला एकूण २६ बँक परवाने इच्छुकांनीअर्ज सादर केले.
४ सप्टेंबर : रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी पदभार स्वीकाराल्यानंतर पूर्व गव्हर्नर बिमल यांच्या अध्यक्षतेखाली अर्जाचे मूल्यमापन करण्यासाठी समिती नेमेल्याची घोषणा केली.