मुंबई: वित्तीय अडचणीत सापडलेल्या रुपी बँकेचे विलीनीकण करून घेण्याच्या सारस्वत सहकारी बँकेच्या प्रस्तावास रिझव्‍‌र्ह बँकेने तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे रूपी बँकेच्या पाच लाख ठेवीदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र याचवेळी पाच लाखांर्पयच्या ७०० कोटींच्या ठेवी बँकेच्या ठेवीदारांना परत करण्यास ठेव विमा महामंडळाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बँकेचे विलीनीकरण अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वित्तीय अनियमिततेमुळे रुपी सहकारी बँकेवर गेल्या नऊ वर्षांपासून रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध लागू केले आहेत. मात्र बँकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या प्रयत्नामुळे बँकेची स्थिती सुधारत असून त्याची दखल घेत रिझव्‍‌र्ह बँकेने या बँकेवरील निर्बंधांना आतापर्यंत  २८ वेळा मुदतवाढ दिली आहे. सध्या बँकेच्या ठेवी १,३०० कोटींच्या असून ठेवीदारांची संख्या पाच लाखांच्या घरात आहे.  बँकेच्या ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन सारस्वत बँकेने रुपीचे विलीनीकरण करून घेण्याबाबत १५ जानेवारी रोजी पाठविलेल्या प्रस्तावास रिझव्‍‌र्ह बँकेने दोनच दिवसापूर्वी तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे या विलीनीकरण प्रक्रियेला गती मिळेल असा विश्वास रुपी बँकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी व्यक्त केला.

rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
Abhishek Lodha transferred 18 percent stake in the company to a charitable trust print eco news
आता लोढादेखील टाटांच्या दानकर्माच्या वाटेवर; धर्मादाय न्यासाला कंपनीतील १८ टक्के हिस्सा हस्तांतरित
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
State Bank quarterly profit of Rs 18331 crore
स्टेट बँकेला १८,३३१ कोटींचा तिमाही नफा
HDFC Bank loan rate hike installment of home loan car loan increase print eco news
एचडीएफसी बँकेच्या कर्जदरात वाढ; तुमच्या गृह कर्ज, वाहन कर्जाचा हप्ता वाढणार काय?

रुपीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू असतानाच पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत देण्यास ठेव विमा महामंडळाने परवानगी दिली आहे. पाच लाखांर्पयच्या ६४ हजार ठेवीदारांना एकूण ७०० कोटी रुपयांच्या ठेवी परत करण्यास परवानगी दिली असून मार्चअखेपर्यंत याचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे ठेवीदारांना  दिलासा मिळाला असला तरी बँकेचे विलीनीकरण अडचणीत येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे बँकेतील ७०० कोटींच्या ठेवी आणि ६४-६५ हजार ठेवीदार कमी होणार असल्याने या विलीनीकरणाबाबत सारस्वत बँक फेरविचार करण्याची शक्यता आहे. बदलल्या परिस्थितीत पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत केल्यावरही सारस्वत बँक विलीनीकरणास तयार असेल, अशी अपेक्षा पंडित यांनी व्यक्त केली.

रुपीचे सारस्वत बँकेत विलीनीकरण व्हावे यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने संवेदनशीलता दाखवावी आणि चौकटीबाहेरची उपाययोजना करून या प्रक्रियेत सारस्वत बँकेला मदत करावी अशी विनंती बँकेतर्फे केंद्रीय अर्थमंत्र्यांना करण्यात येणार असल्याचेही पंडित यांनी सांगितले. तर सर्वसामान्य ठेवीदारांच्या मदतीचा विचार करून बँकेने हा विलीनीकरणाचा प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेला दिला होता. ठेव विमा महामंडळाच्या पुढाकारातून हेच काम होत असेल तर ते स्वागतार्हच आहे. मात्र ७०० कोटींच्या ठेवी परत होणार असतील तर विलीनीकरणाच्या प्रक्रियेला अर्थच उरत नाही, अशी प्रतिक्रिया सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी दिली. तथापि बदललेल्या परिस्थितीत रुपी बँकेला तारण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेलाही वेगळा विचार करावा लागेल, असे ठाकूर यांनी सूचित केले.