सहारा समूहातील सहारा इंडिया फायनान्शिअल कॉर्पोरेशनच्या प्रमाणपत्राची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या या कारवाईमुळे समूहाला बिगर बँकिंग वित्त कंपनी म्हणून या उपकंपनीमार्फत व्यवसाय करता येणार नाही. रिझव्‍‌र्ह बँकेच्या या निर्णयामुळे लखनऊस्थित (उत्तर प्रदेश) नोंदणी असलेल्या या कंपनीचे कामकाज ३ सप्टेंबरपासूनच ठप्प करण्यात आले आहेत. कंपनीची नोंदणी डिसेंबर १९९८ मधील आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या कारवाईपूर्वी सेबीने समूहाला म्युच्युअल फंड व्यवसायास प्रतिबंध केला आहे.

धनादेश वटणावळीवर गुरुवारी बहिष्कार
मुंबई : गणेश चतुर्थीनिमित्त येत्या गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुटी जाहीर न करण्याच्या निषेधार्थ धनादेश वटणावळीवर बहिष्कार टाकण्याचे पाऊल बँक कर्मचाऱ्यांनी उचलले आहे. राज्यात या दिवशी सार्वजनिक सुटी असली तरी रिझव्‍‌र्ह बँकेने धनादेश वटणावळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ती दिलेली नाही. परिणामस्वरुप बँकांच्या सेवा शाखांमध्ये हे कामकाज चालू ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियनने तिचा निषेध केला असून या कामकाजावर बहिष्कार टाकण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबई परिसरातील जवळपास २०० कर्मचारी धनादेश वटणावळीचे कामकाज गुरुवारी करणार नसल्याने पश्चिम परिमंडळातील ३ ते ४ लाख धनादेश वटणावळीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Story img Loader