खुंटत चाललेला विकासाचा दर आणि स्थिर होऊ पाहात असलेली महागाई या पाश्र्वभूमीवर व्याजदर कपातीच्या उंचावणाऱ्या आशांना रिझव्र्ह बँकेने तिलांजली दिली आहे. देशाचे सद्य अर्थचित्र सुधारण्यासाठी किमान अध्र्या टक्क्यांच्या कपातीसाठी पाण्यात देव टाकून बसलेल्या तमाम उद्योगक्षेत्रासह सामान्य कर्जदाराचीही निराशा झाली आहे.
केवळ पाव टक्के रेपो दर कमी करून गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी चालू आर्थिक वर्षांत विकासाचा दर ६ टक्क्यांपर्यंत तसेच महागाईदेखील ५.७ टक्क्यांच्या खाली येणार नाही, असा निराशाजनक सूर चालू आर्थिक वर्षांच्या पतधोरणात व्यक्त केला. विदेशी, स्थानिक गुंतवणूक होत नसल्याने निर्मिती, सेवा क्षेत्राची वाढ मंदावत चालल्याचा आक्षेप घेत मध्यवर्ती बँकेने वाढत्या चालू खात्यातील तुटीबाबतच्या सरकारच्या चिंतेत समभागी होणे पसंत केले.
आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धात जुलैपासून एकूणच अर्थव्यवस्था वेग पकडेल अशा आशावादासह यंदा मान्सून समाधानकारक राहिल्यास कृषी क्षेत्राची वाढ व महागाई कमी झाल्यास किमान तिमाहीपर्यंत तरी व्याजदर कपातीची मोठी भेट अशक्य असल्याचे संकेतही गव्हर्नरांनी दिले. बँकांना निधीची चणचण असल्याचा इन्कार करत रोख राखीव अर्थात सीआरआरमध्ये कपात न करण्याचे धोरणही रिझव्र्ह बँकेने अनुसरले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा