महागाईचे चटके सहन करत असलेल्या सामान्यांसाठी दिलासादायक ठरू शकेल, अशी घोषणा रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी केली. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेटमध्ये पाव टक्क्याने कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे गृहकर्जांचे व्याजदर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रिझर्व्ह बॅंकेने चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीसाठीचे पतधोरण शुक्रवारी जाहीर केले. बॅंकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी पत्रकार परिषदेत पतधोरणातील बदलांची माहिती दिली.
बॅंकेने रोख राखीव निधीमध्ये (सीआरआर) कोणताही बदल केलेला नाही. चालू आर्थिक वर्षात विकासदर ५.७ टक्के राहिल, असेही बॅंकेने पतधोरण जाहीर करताना म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा