रिझव्र्ह बँकेचा विश्वास
रिझव्र्ह बँकेने केलेल्या अर्धा टक्का दर कपातीचा लाभ प्रत्यक्ष व्यापारी बँका त्यांच्या कर्जदारांपर्यंत पूर्ण स्वरूपात निश्चितच पोहोचवतील, असा विश्वास रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.
जानेवारी २०१५ पासून रिझव्र्ह बँकेने १.२५ टक्के दर कपात केली आहे. तुलनेत व्यापारी बँकांनी त्यांचे ऋण दर (बेस रेट) ०.५० टक्क्य़ांपर्यंत कमी केले आहेत. गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँका व्याजदर कमी करीत नसल्याबद्दल वारंवार नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकी हीच बाब खान यांनी राष्ट्रीय वित्तीय सर्वसमावेशक परिषदेच्या निमित्ताने अधोरेखित केली. कर्ज स्वस्त कमी करण्याबाबत वेगवेगळ्या बँकांचा भिन्न दृष्टिकोन आहे. रिझव्र्ह बँकेच्या प्रमाणात बँकांना व्याजदर कपात करण्यास काही कालावधी लागू शकतो, असेही ते म्हणाले. यासाठी ठेवींवरील व्याजदर हाही अडसर ठरत असल्याचे नमूद करीत खान यांनी सध्या केंद्र सरकारच्या स्तरावर विविध लोकप्रिय योजनांवरील (भविष्य निर्वाह निधी योजना, टपाल विभागाच्या बचत योजना) व्याजदर हे सरकारी रोख्यांवरील व्याजदराच्या समकक्ष आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा