‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ (केवायसी) बाबतची बँक खाते उघडण्याविषयीची नियमावली शिथिल करताना रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी जारी केलेल्या सूचनेअंतर्गत निवासाचा पत्ता म्हणून एकच पुरावा देण्याची सुविधा खातेदारांना उपलब्ध करून दिली. कामानिमित्त शहरे बदलणे भाग पडलेल्या आणि राहण्याचा निश्चित ठावठिकाणा नसलेल्या अल्पवेतनी श्रमिक व स्थलांतरितांना यामुळे दिलासा मिळाला आहे. कायमस्वरूपी निवासी पत्ता नसला तरी आता नव्याने बँक खाते उघडण्यासाठी तात्पुरता निवासी पत्ता दर्शविणारा केवळ एकच पुरावा दिला तरी पुरेसा ठरेल, अशा सूचना रिझव्‍‌र्ह बँकेने वाणिज्य व नागरी सहकारी बँकांना दिल्या आहेत.

Story img Loader