रिझव्र्ह बँकेने २००५ पूर्वी छापलेल्या नोटा आणखी सहा महिने चलनात ठेवता येणार आहेत. जुन्या नोटा ३० जून २०१५ पर्यंत वापरण्यास रिझव्र्ह बँकेने मंगळवारी उशिरा मुदतवाढ दिली.
२००५ पूर्वीच्या नोटा १ जानेवारी २०१५ पासून बाद करण्याचे पाऊल सुरुवातीला उचलले होते. तसे निर्देशही व्यापारी बँकांना देण्यात आले होते. या जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची सुविधा तूर्त कायम ठेवण्यात आली आहे. जुन्या नोटा वितरित न करण्याच्याही बँकांना सूचना आहेत.
देशात आढळणाऱ्या बनावट नोटांबाबतची दक्षता म्हणून २००५ पूर्वी छापलेल्या नोटा बाद करण्याचा निर्णय सर्वप्रथम मार्च २०१४ मध्ये घेण्यात आला होता. यानुसार १ जुलै २०१४ पासून २००५ पूर्वीच्या नोटा बाद होणार होत्या. मात्र त्यानंतर त्या १ जानेवारी २०१५ पर्यंत चलनात ठेवण्याची परवानगी देण्यात आली. आता ही मुदत आणखी सहा महिन्यांनी वाढविण्यात आली आहे.
रिझव्र्ह बँकेनुसार जुन्या नोटा ओळखण्यासाठी ज्या नोटांच्या मागे, तळाखाली २०१०, २०१२ असा वर्षांचा आकडा नाही त्या २००५ पूर्वीच्या समजाव्यात. २००५ नंतरच रिझव्र्ह बँकेने नोटांच्या मागे बारीक इंग्रजी अक्षरात वर्षांचा आकडा जारी करणे सुरू केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा